लोकमत न्यूज नेटवर्कवर्शी : धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेला जलवाहिनीला कमखेडा शिवारात गळती लागली़ यामुळे पाणी तर मातीमोल झालेच, शिवाय शेती पिकांचे नुकसान झाले़शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा गावाजवळ तापी योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी शेतात घुसले आहे़ कमखेडा येथील शरद काशिनाथ बडगुजर, भरत काशिनाथ बडगुजर हे आपल्या शेतात कुटुंबांसह निंदणीचे काम करीत होते़ अचानक पाईपलाईनला मोठे भगदाड पडले़ त्यातून पाण्याची गळती सुरु झाली़ त्यांच्या कापूस पिकांचे नुकसान झाले़ पाण्याचा प्रवाह इतका होता की ते पाणी आजू बाजूच्या शेतात घुसले़ त्यात राजेंद्र बडगुजर यांच्याही शेतात पाणी गेले़ सुदैवाने पिक नसलेतरी जमिनीचे मात्र नुकसान झाले़
पाईपलाईन फुटल्याने शेती पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 8:54 PM