शिरपूर : तालुक्यातील गिधाडे गावाजवळील ब्रिटिशकालीन पुलाने कधीच ‘शंभरी’ ओलांडली आहे. मात्र या धोकेदायक पुलावरुन अजूनही वाहतूक सुरुच आहे.ब्रिटीशकाळापासून शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावाजवळील जुना तापी पुलावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी होती़ दरम्यान, सुलवाडे बॅरेजचे काम झाल्यामुळे या पुलाकडे दुर्लक्ष करीत सावळदे गावाजवळ नव्याने पूल बांधण्यात आला़ त्यामुळे या गिधाडे पूलाची दुरावस्था तशीच राहीली़ विशेषत: या पूलाने शंभरी देखील कधीच ओलांडली असल्यामुळे तो पूल रहदारीस वापरणे जोखमीचे काम आहे. असे असताना देखील त्या पूलावरून अजूनही मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू आहे़ हा पूल शिरपूर व शिंदखेडा तालुक्याला जोडणारा आहे़ मुंबई-आग्रा महामार्ग सुरूवातीला दभाशी-सुकवद-गिधाडे गावाजवळून जात होता़ या मार्गावर गिधाडे गावाजवळ ब्रिटीशकालीन दगडी पूल बांधण्यात आला आहे़ तापीला महापूर येत असल्यामुळे पूलावरून पाणी वाहत असे, त्यामुळे अनेकदा मार्गावरील रहदारी ठप्प होत होती़ तसेच सुलवाडे बॅरेजचे काम झाल्यामुळे तेथे पाणी अडवायला सुरूवात झाली़ त्यामुळे नवीन उंच पूल गेल्या १२-१५ वर्षापूर्वी सावळदे गावाजवळ बांधण्यात आला, परंतु गिधाडे गावाजवळील ब्रिटीशकालीन पूलाची दुरावस्था तशीच राहीली़ विशेषत: या पूलाने शंभरी देखील कधीच ओलांडली असल्यामुळे तो पूल रहदारीस वापरणे जोखमीचे काम असतांना देखील त्या पूलावरून आजही मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू आहे़
धोकेदायक ब्रिटिशकालीन गिधाडे पुलावरुन वाहतूक सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 7:18 PM