लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यातील डांगुर्णे गावात शुक्रवारी संध्याकाळी पोलीस कर्मचाºयांनी हजारो लिटर गावठी दारू नष्ट केली. तसेच या दारूनिर्मितीच्या भट्ट्याही उदध्वस्त करण्यात आल्या. सकाळी गीतांजली कोळी यांनी महिलांची बैठक घेतली. त्यात अनेक महिलांनी दारूमुळे गावात भांडणे व दंगल झाली आहे , येथे घराघरात दारू गाळली जाते तरी त्याचा बंदोबस्त कोणीच करत नाही. आम्ही सर्व उध्वस्त झालो असल्याचे सांगितले. त्या नुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास या गावातील १०० पेक्षा जास्त महिला-बालकांनी येथील पोलीस ठाण्यात येऊन कैफियत मांडली. येथील पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांनी महिलांना सांगितले की मी आपल्या गावात येऊन कारवाई करतो. त्या नुसार त्यांनी कर्मचाºयांसह जाऊन १० ते १५ दारू अड्डे उदध्वस्त करून हजारो लिटर गावठी दारू गीतांजली कोळी व महिलांच्या समक्ष नष्ट केली. गावात दारुमुळे पुरूष व्यसनाधीन होऊन संसाराची दैना उडाली आहे. काही महीला विधवा झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या बंद पडलेल्या शौचालयातही दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य ड्रम मटके आढळून आले. ते सुद्धा यावेळी नष्ट कण्यात आले. डांगुर्णे गावात गावठी हातभट्टीची दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याने कित्येक महीलांचा संसार उद्ध्वस्त झाले आहेत. गावातील भर वस्तीतच दारु विक्री केली जाते. तंटाग्रस्त गाव म्हणून डागुर्णें गाव प्रसिध्द आहे. या सर्व भांडणांचे मुळ कारण गावात सर्रास पणे विकली जाणारी दारू आहे.महिलांचे पोलिसांना निवेदन गावातील महीलांनी एकत्रितपणे येवून गावात दारूबंदीसाठी तीव्र संघर्ष सुरू केला. या दारूमुळे सर्वांत जास्त हालअपेष्टा महिलांना सहन कराव्या लागत आहेत. यातूनच आज दारूबंदी महीला, युवा मोर्चाच्या गिंताजली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महीलांसह नागरीक उपस्थित होते. पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनावर ६० ते ७० गावातील महिल्यांच्या स्वाक्षºया आहेत. या निवेदनाची तत्काळ दखल शिंदखेडा पोलिसांनी ही कारवाई केली. दारू निर्मितीसाठी सडक्या वस्तू, दूषित पाणी यांचा वापर होत असल्याचे या वेळी आढळले. यावेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम.एच. सय्यद, पो.कॉ.तुषार पोतदार, राजेंद्र पावरा, दिपक भिल. यांनी कारवाई केली. यानंतर उपस्थित महीलांनी गावांतून रॅली काढून दारूबंदी झालीच पाहिजे, दारू विक्री करणाºयांवर कारवाई झाली पाहिजे. अशा घोषणा देत जागृती केली. यावेळी धुळे येथील दारूबंदी महीला, युवा मोर्चाच्या गीतांजली कोळी, उषा दादाभाई मोरे, सुमन मोरे, रेणुबाई मोरे, सिंधुबाई मोरे, विमलबाई मोरे, आरती मोरे, आशाबाई मोरे, रेणुबाई मोरे, निलाबाई मोरे, सिमा मोरे, लक्ष्मीबाई मोरे, सुवणार्बाई मोरे आदी महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावठी दारु पिऊन आजाराने मयत
डांगुर्णे गावात गावठी हातभट्टी ची दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. त्यामुळे नागरिकांसह तरुण मुलं ही व्यसनाधीन झाले आहेत. गावठी दारू पिऊन आजाराने मरण पावले आहेत. दारुमुळे गावात भांडणतंटे, दंगली झालेल्या आहेत.