लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल नालंदा समोरील गतिरोधकावर कोणत्याही प्रकारचे रंगाचे पट्टे आखलेले नाही की हायमास्ट नाही़ परिणामी वेगात असलेल्या वाहनांमध्ये धडक होते़ वाहनांच्या नुकसानीसोबत महामार्गावरील हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनला आहे़ याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे़ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले़ परिणामी या मार्गावरुन येणारे आणि जाणाºया वाहनांचा वेग प्रमाणापेक्षा जास्त आहे़ धुळ्याकडून इंदौरकडे जाणाºया मार्गावर गतिरोधक आहे़ या गतिरोधकाच्या सुरुवातीला मोठा उतार असल्यामुळे वेगात येणाºया वाहनाला अधिक वेग असतो़ रात्रीच्यावेळेस या ठिकाणी हायमास्ट नाही की पथदिवे नाही़ तसेच गतिरोधक दिसण्यासाठी पांढरे पट्टे आखलेले नाही़ एकदम वाहन आल्यानंतर थांबते आणि त्या वाहनाला मागून येणारे वाहन धडकते़ यात जीव गमाविण्याचा कटू प्रसंग ओढवतो़ ही बाब दुर्लक्षित आहे़
महामार्गावर त्यातल्या त्यात नालंदा हॉटेलच्या समोरील गतिरोधक रात्रीच्या वेळेस ट्रकचालकांना दिसत नाहीत़ त्यावर पांढरे पट्टे लावायला हवे़ दिशादर्शक फलकही लावण्याची गरज आहे़ - संदिप पाटीलमहामार्गावर उत्तम आणि विशिष्ठ उंचीचे गतिरोधक असायला हवे़ त्यात कोणतेही वाहन अडकणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी़ पुढे गतिरोधक असल्याचे दिशादर्शक फलक लावायला हवेत़ - दशरथ चौधरीगतिरोधकांची झालेली खराब अवस्था आणि अंधारामुळे शक्यतोअर अपघात हे होत असतात़ अपघात होऊ नये यासाठी रस्ता आणि गतिरोधक व्यवस्थित असायला हवे़ पण नेमके त्याचकडे दुर्लक्ष आहे़ या चौकात हायमास्ट लावायला हवा़ - वाल्मिक चौधरीअंधारामुळे रस्त्याच्या पुढे गतिरोधक आहेत हे दर्शविणारे फलक लावायला हवे, पण ते कुठेही दिसत नाहीत़ पुलावर उतार जास्त असल्यामुळे वाहन अगदी वेगाने येत असतात़ त्यात वेग कमी करावा असा संदेश देणार दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे़ - शकील शेख