साक्री : तालुक्यातील उंबर्टी येथील शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झालेल्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली़ दरम्यान त्याच विजेच्या धक्यात एक बैल देखील ठार झाला़ आहे़उंबर्टी येथील ६९ वर्षीय शेतकरी आनंदा पुंडलिक भदाणे नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी फिरण्यास गेले होते़ गावातील एका विजेच्या खांबाला बांधलेला एक बैल विव्हळत असल्याचे त्यांचा निदर्शनात आले़ भदाणे यांनी तरफडणाºया बैलाला स्पर्श केल्यावर त्यांना विजेचा शॉक लागल्याचे समजले़ विजेचा प्रवाह जास्त असल्याने आंनदा भदाणे आणि बैल खांबाला चिटकले. बैलाचा मृत्यू झाल्याने तेथे जाळही सुरु झाला होतो़ त्यामुळे भदाणे गंभीर भाजल्याने जखमी झाले होते़ याबाबत नातेवाईक व ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने साक्री येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते़ उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी त्यांचा शेतकरी भदाणे यांचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उंबर्टीतील प्रगतीतील शेतकरी उत्तम भदाणे, साहेबराव भदाणे, माणिक भदाणे, मुरलीधर भदाणे त्यांचे बंधू तर ठाणे येथील वनपाल विश्वास भदाणे, जयवंत भदाणे यांचे मुल आहेत़
विजेच्या धकक्याने शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 9:51 PM