लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गावर वाघाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात गणेश बोरसे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल करण्यात आले़ या वेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले़ ही घटना सोमवारी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली़ गणेश निळकंठ बोरसे (पाटील) (३८, रा दत्ताने ता़ शिंदखेडा हल्ली मुक्काम लक्ष्मी नगर, सोनगीर ता धुळे) हे (विना पासिंग) नवीन घेतलेल्या होंडा कंपनीची मोटार सायकलने आपल्या नोकरीच्या ठिकाणी बाभळे औद्योगिक वसाहतीकड जात असताना वाघाडी फाट्यावरून वळण घेत असताना धुळे कडून इंदोरकडे जाणारी कार क्रमांक एमएच ०४ जीजे ६३६९ या भरधाव येणाºया वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली व मोटरसायकल सह कार वर जोरदार आदळली़ यावेळी त्यांना तात्काळ येथील स्थानिकांच्या मदतीने टोलप्लाझाच्या रुग्णवाहिकेद्वारे सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मयत घोषित केले़ दरम्यान, मोटर सायकलला धडक देणारी कार ही भार्इंदर , ठाणे येथील व चालक चे नाव शेख सगीर अहमद अब्दुल रशीद असल्याचे समजते़दरम्यान मृत युवक हे बाभळे औद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत कामाला होते. गेल्या तीन वर्षांपासून सोनगीर येथील लक्ष्मी नगर मध्ये राहत होते़ त्यांच्या पश्च्यात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे़ घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात होऊन मयत झाल्याने पुन्हा महामार्गावर असलेल्या विविध त्रुटींबाबत चर्चा होऊ लागली़ मात्र संबंधित कंपनी अपघात झाल्यानंतर आपल्या चुका दुर्लक्षित करीत असते़ वाघाडी रस्त्यापर्यंत दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रस्ता तात्काळ तयार केला गेला पाहिजे, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष चेतन चौधरी यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली़
कार-दुचाकी अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:08 PM