लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज कोसळून एका ११ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू तर त्याचे दोन चुलत भाऊ जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील पाडळदे शिवारात शनिवारी दुपारी घडली़ या दुर्घटनेत एका म्हशीचाही अंत झाला आहे़ धुळे तालुक्यातील पाडळदे गावात राहणारा पंकज ज्ञानेश्वर राठोड (११) हा जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीत आहे़ सकाळी ११ वाजता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे तो हितेश संतोष राठोड (१०) आणि आनंद (लखन) दत्तात्रय राठोड (६) यांच्या सोबत शेतात गेला़ नेहमीप्रमाणे शेतात फिरत असताना अचानक दुपारी पावसाला सुरुवात झाली़ पावसापासून बचाव व्हावा यासाठी हे तिघे जण शेतातच असलेल्या निंबाच्या झाडाखाली थांबले होते़ त्याचवेळेस अचानक वीज अंगावर कोसळून पंकज राठोड याचा जागेवरच मृत्यू ओढवला़ तर त्याच्यासोबत असलेले हितेश संतोष राठोड, आनंद (लखन) दत्तात्रय राठोड हे जखमी झाले़ घटना लक्षात येताच या तिघांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून पंकज राठोड याला मृत घोषीत केले़ तर त्याच्या सोबतच्या दोघां मुलांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ या दुर्घटनेत इंद्रजीत मदन राठोड यांच्या म्हशींचा मृत्यू झाला आहे़ पदाधिकाºयांची भेटघटनेची माहिती मिळताच धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, अशोक सुडके व गोकूळसिंग राजपूत यांनी मृत व जखमींच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांचे सात्वन केले़ मृत मुलाच्या व जखमींच्या पालकांना तातडीने आर्थिक मदत देण्याची सूचना आमदार कुणाल पाटील यांनी तहसीलदार किशोर कदम यांना दिल्या आहेत़ दरम्यान, धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात वीज प्रतिरोधक यंत्र बसवावेत अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे़
पाडळदेत वीज कोसळल्याने मुलाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:57 PM