ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.2 - तालुक्यातील तापी नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या मोठय़ा प्रमाणावर वाळू वाहतूक केली जाते. मंगळवारी वाळू घेऊन भरधाव वेगाने येणा:या ट्रॅक्टरने समोरून येणा:या दुचाकी स्वाराला उडविले. उपचारादरम्यान जखमीचा बुधवारी मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास खामखेडा ते टेकवाडे गावादरम्यान हा अपघात झाला़ टेकवाडे येथील दीपक ब्रिजलाल कोळी (18) हा युवक अर्थे येथील मंडप डेकोरेशन येथील काम आटोपून दुचाकीने घराकडे निघाला होता. त्याचवेळी समोरून भरधाव येणा:या ट्रॅक्टरने त्यास जोरदार धडक दिली़ घटना घडल्यानंतर काही वेळानंतर विजय चौधरी याने घटनेचे वृत्त गावात व जखमीच्या नातेवाईकांना सांगितल़े दरम्यान, संशयित ट्रॅक्टर चालकाने ट्रॉली सोडून ट्रॅक्टर घेवून पळ काढला़
जखमी दीपक कोळी यास तातडीने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केल़े मात्र डोक्यास जबर मार लागल्यामुळे त्यास जिल्हा रूग्णालयात हलविल़े मात्र उपचार सुरू असताना बुधवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला़ दीपकच्या पश्चात आई, वडील, 1 मोठा भाऊ असा परिवार आह़े