निमगुळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ रहिवासी व पुण्यात अभियंता असलेला रोहित पाटील (बागल) याने आत्महत्या केली़ चुलत बहिणीच्या लग्नासाठी तो गावात येणार होता, तत्पुर्वी अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली़शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथील मुळ रहिवासी व पुणे येथील वाकड ग्रीन सोसायटीत राहणारे व हिंजवडीमधील नामाकींत कंपनीत अभियंता पदावर कार्यरत असलेले रोहीत बापू पाटील (बागल) (२८) या तरुणाने गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पुणे येथील राहत्या घराच्या बाराव्या मजल्यावरुन खाली पडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला़रोहित यांचे निमगुळ येथे शेतकरी कुटुंब आहे़ मोठा भाऊ आणि तो दोघेही अभियंता असून मोठ्या पदावर कार्यरत होते़ रोहित या तरुणाचा विवाह बाकी होता़ मात्र, शनिवार २० एप्रिल रोजी काकाच्या मुलीचा अर्थात चुलत बहिणीचा विवाह होता़ त्याआधीच रोहित याचा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे़त्याचा मृतदेह निमगुळ गावात आणल्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, भावजाई, बहिण, मेहुणे, काका-काकू असा परिवार आहे़ निमगुळ येथील बागल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एम़ एस़ पाटील यांचा रोहित हा पुतण्या आहे़ शनिवारी होणाऱ्या लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना या अंत्यसंस्काराला जावे लागले.
रोहित पाटील याचा पुण्यात अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:50 PM