लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर,ता. साक्री : कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात छडवेल येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक तथा साक्री पंचायत समिती सदस्य पी.एच. पवार (५३) यांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास निजामपूर परिसरात वासदरे घाटात झाला. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.पी.एच. पवार (५३) हे तालुक्यातील छडवेल येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. ते आज सकाळी दुचाकीने (क्र.एमएच १८-एस.९२८९) छडवेल येथे जात होते. वाटेत निजामपूर भागातील वासदरे घाटात त्यांच्या दुचाकीला समोरून येणाºया कारने (क्र. जी.जे.५- २५०३) जोरदार धडक दिली. त्यात ते जबर जखमी झाले. त्यांना साक्री रूग्णालयात नेत असतांना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते साक्री पंचायत समितीचे भाजपचे सदस्य होते. पी.एच. पवार हे मूळचे कासारे येथील रहिवासी होते. या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.