शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी; मंत्र्याच्या दाव्याने खळबळ, धुळे दौऱ्यात सुरक्षा वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 1:01 PM

Ajit Pawar : गुप्तवार्ता विभागाच्या सुचनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुरक्षा वाढवली आहे.

Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जनसन्मान यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. 

"जनतेचा सेवक आहेत, अशा पोकळ धमक्या नेहमी येत असतात. या असल्या धमक्यांना घाबरुन किंवा त्याची चिंता करण्यापेक्षा जनतेचा सन्मान करण्यासाठी हा आमचा दौरा सुरू रोहिलं. आमची ही यात्रा बंद राहणार नाही, असंही मंत्री अनिल पाटील म्हणाले. 

शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणासाठी रमेश केरेंचा मोर्चा; पवारांनी भेट घेत केली चर्चा

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुळ्यात जनसन्मान यात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकी आल्याचे समोर आले. प्रशासनाने धुळे दौऱ्यात सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. 

धुळे दौऱ्यात विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या पोलिसांना मिळाल्या आहेत. या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी अजित पवारांची सुरक्षा वाढवली आहे. या धमकीवर बोलताना  मंत्री अनिल पाटील म्हणाले, जनतेचा सेवक असल्याकारणाने अजित पवार जनतेमध्ये जाऊन काम करत असतात. त्यातच अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, असंही पाटील म्हणाले. 

काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार

राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी यात्रा सुरू केल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सनसन्मान यात्रा सुरू केली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे.  या दोन्ही यात्रेच्या माध्यमातून दोन्ही गटात एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेही राज्याचा दौरा करत आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliceपोलिस