लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सततच्या जाचाला कंटाळून गरीब नवाज नगरात राहणाºया महिलेने शुक्रवारी दुपारी स्वत:ला पेटवून घेतले होते़ मृत्यूशी झुंज देत असताना तिचा शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुध्द वाढीव कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला़ सासरकडील मंडळींकडून होणाºया सततच्या जाचाला कंटाळून शहरातील गरीब नवाज नगरातील महिलेने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला़ तिल तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ ती मृत्यूशी झुंज देत होती़ रईसा शरीफ अली सय्यद (३०, रा़ गरीब नवाज नगर, धुळे) या विवाहितेने चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती़ काम येत नाही या कारणावरुन शारीरिक व मानसिक छळ तिचा होत होता़ नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरुन कमरेवर जोराची लाथ मारुन जमिनीवर तिला पाडण्यात आले़ शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली होती़ ही घटना शुक्रवारी दुपारी घडली़ रागाच्या भरात घरातील पेट्रोलची बाटली घेऊन स्वत: तिने पेटवून घेतले़ याप्रकरणी अमिनाबी सैय्यद नूर सैय्यद, नफिज सैय्यद नूर सैय्यद (दोनही रा़ गरीब नवाज नगर, धुळे) यांच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ तिच्या मृत्यूमुळे आता वाढीव कलम लावण्यात आले आहेत़
धुळ्यात जाळून घेतलेल्या महिलेचे उपचारावेळी निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:15 PM
गरीब नवाज नगर : वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल
ठळक मुद्देगरीब नवाज नगरातील घटनासततच्या जाचाला कंटाळून उचले टोकाचे पाऊलचाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात वाढीव कलमान्वये गुन्हा