बोरद : कोपरगावच्या संजीवनी कारखान्याने तळोदा तालुक्यातील शेतक:यांना 2300 रुपये टनप्रमाणे उसाचा भाव जाहीर केलेला असताना केवळ दोन हजार रुपयांप्रमाणे धनादेश देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शेतक:यांनी कारखान्याच्या तीन कर्मचा:यांना गावातच बसवून ठेवल्याची घटना घडली. दरम्यान, कोपरगावहून कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी सायंकाळी बोरद येथे येण्यास निघाल्याची माहिती मिळाली. यंदा कारखान्यांपुढे संकट असल्यानेग जिल्ह्यात ऊस पळवापळवी झाली. कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखान्याने 2300 रुपये मे.टनप्रमाणे भाव सांगत ऊसतोड केली. मात्र 2 हजाराप्रमाणे पेमेंट अदा केले. उर्वरित पेमेंट देण्यासाठी कारखान्याचे कर्मचारी सोमवारी सकाळी मोड येथे दाखल झाले. उर्वरित 300 रुपयांचा चेक आठ दिवसात देण्याचे सांगितले. संतापलेल्या शेतक:यांनी तिन्ही कर्मचा:यांना एका घरात बसवून ठेवले. 4कार्यकारी संचालकांनी त्यांनी दुस:या टप्प्यात उर्वरित रक्कम देण्याचे सांगितले, परंतु शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तातडीने कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी मोडकडे येण्यास निघाले होते. मंगळवारी 300 रुपयांची रक्कम अदा करण्यात येणार असल्याची माहिती शेतकी अधिकारी जी.बी.शिंदे यांनी दिली.
उसाच्या पेमेंटवरून वाद पेटला!
By admin | Published: February 07, 2017 1:14 AM