धुळे : महापालिका शाळांच्या शालेय पोषण आहाराची जबाबदारी महिला बचत गटांना देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे़ त्यासाठी प्राप्त झालेल्या २३ पैकी एक निविदा निश्चित करण्यात आली आहे़मनपा क्षेत्रातील पात्र शाळांसाठी शिजवलेल्या गरम आहाराचा पुरवठा करण्यासाठी आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदां संदर्भातील प्रक्रियेसाठी शालेय पोषण आहार समितीची बैठक शुक्रवारी सकाळी उपायुक्त शांताराम गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपाचे शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी महेंद्र जोशी यांनी योजनेच्या नियोजनाबाबतचा आराखडा उपस्थितांसमोर सादर केला. त्यात या योजनेचे निकष, समिती सदस्यांची जबाबदारी, गुणदान आदी मुद्यांबाबत माहिती दिली.या बैठकीप्रसंगी प्राचार्या, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते़
सेंट्रल किचन पध्दत सुरू करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:46 PM