लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : धुळयात राज्यातील चौथे व नाशिक विभागातील पहिले डिजीटल ग्रंथालय उभारण्यासाठी पांझरा चौपाटीलगतची जागा निश्चित करण्यात आली असली तरी या जागेवरील आरक्षण बदलासंदर्भात लवकरच महासभेत निर्णय होणार आहे़ २६ डिसेंबर २०१७ शासकीय ग्रंथालयाचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले होते़ शहरातील पांझरा चौपाटीलगत असलेल्या मौजे देवपूर गट क्रमांक १३ पैकी सि़सक़्रमांक ४७७९/१ क पैकी २० गुंठे जागा शासकीय ग्रंथालय इमारतीसाठी प्रस्तावित करण्यात आली असल्याने या जागेवर असलेले उद्यानाचे आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी मनपाकडे केली होती़ त्यानुसार मनपा नगररचना विभागाने आयुक्तांकडे कार्यालयीन प्रस्ताव सादर केला असता आयुक्तांनी १८ आॅगस्टला हा विषय महासभेत ठेवण्याची शिफारस केली होती़ सदर प्रस्ताव नगररचना विभागाने नगरसचिव कार्यालयास सादर केल्याचे नस्तीवरून स्पष्ट होत असले तरी हा प्रत्यक्षात संबंधित प्रस्ताव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला नव्हता़ याप्रकरणी आयुक्तांनी प्ऱनगररचनाकार व अन्य दोघांना नोटीसाही बजावल्या होत्या़ दरम्यान, आता संबंधित प्रस्ताव नगरसचिव विभागाला प्राप्त झाला असून तो लवकरच होणाºया महासभेत सादर केला जाणार आहे़ महासभेत आरक्षण बदलासंदर्भात निर्णय घेऊन संबंधित ठराव शासनाला सादर केला जाईल़ शासकीय ग्रंथालयाची जागा ही आधी जिल्हा प्रशासनाच्या मालकीची होती़ मात्र संबंधित जागा संपादन प्राधिकरण म्हणून धुळे महापालिकेने मंजूर विकास योजनेनुसार विकसित करणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाने संबंधित २़८० हेक्टर जागा महापालिकेकडे वर्ग केली आहे़ दरम्यान, संबंधित मंजूर विकास योजनेनुसार उद्यानाचे आरक्षण असून जागेच्या वापरात फेरबदल करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१) नुसार कार्यवाही आवश्यक आहे़ त्यानुसार उद्यानाऐवजी आरक्षित जागेत जिल्हा ग्रंथालयाची इमारत उभारली जाणार आहे़ त्यामुळे महासभेत आरक्षण बदलाचा ठराव करून तो शासनाला सादर केला जाणार आहे़ शासकीय ग्रंथालयासाठी जिल्हा नियोजन समितीने निधी मंजूर केला आहे़ ग्रंथलयाची इमारत दोन मजली राहणार असून एकूण बांधकाम १ हजार १०६़१८ चौमी असेल तसेच यात संरक्षण भिंत व इतर अनुषंगिक बाबींचा समावेश आहे़
आरक्षण बदलासंदर्भात होणार निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 6:13 PM
शासकीय ग्रंथालयासाठी आरक्षित जागा : मनपा देणार शासनाला ठराव, काम लवकरच होणार सुरू
ठळक मुद्देडिजीटल ग्रंथालयात तीन रिडींग रूमसह ४० हजार पुस्तके उपलब्ध राहतील़ केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमच नव्हे तर स्पर्धा परीक्षांसाठी चांगले व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल़जिल्हा शासकीय ग्रंथालयाच्या इमारतीचे भूमीपुजन आमदार अनिल गोटे यांनी केले होते़ शिवाय निधी मिळविण्यासाठीही त्यांचा पाठपुरावा होता़ त्यामुळे महासभेत सदस्य काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल़शहरातील उत्तमराव पाटील समाधी स्थळाशेजारील जागेत जिल्हा गं्रथालयाची इमारत प्रस्तावित असून सध्या या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे़ प्रक्रिया पूर्ण होताच कार्यादेश दिल्यानंतर काम सुरू होईल़ तर आरक्षण बदलाच्या संदर्भातील प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहील़