सुरेश विसपुते । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बाजारात सध्या भाजीपाल्याची मोठी आवक होत असून त्याचा परिणाम दरात घसरण होण्यात झाला आहे. मेथी, कोथिंबिरीची तर दोन-तीन रूपये दराने जुडीने विक्री होत आहे. अपवाद वगळता सर्वच भाज्यांच्या दरात मोठी घट झाल्याचे पहावयास मिळत आहे. ही स्थिती महिनाभर कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जिल्ह्यासह जळगाव, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड भागातून रोज भाजीपाल्याची आवक होत असून त्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात तसेच ओखी वादळाच्या प्रभावामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांचा कल भाजीपाला विक्रीकडे कल वाढला आहे. परंतु यामुळे आवक वाढल्याने दर घसरले आहेत. वांग्याच्या १२ किलोच्या गोणीस मिळतात अवघे ५० रुपये वांग्यांचीही मोठी आवक होत असून १० ते १२ किलोच्या गोणीला अवघे ५० रुपये मिळत आहेत. गेल्या १५ दिवसांत भाज्यांच्या दरात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची घट झाल्याचे दत्तू नाना महाले व्हेजिटेबल कंपनीचे शिरीष देवरे यांनी सांगितले.मेथी, कोथिंबिरीचे हाल सध्या बाजारात सर्वच भाज्यांचे दर गडगडले असल्याचे दिसत आहे. फ्लॉवर अवघे ५-६ रूपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. सर्वात जास्त हाल मेथी व कोथिंबिरीचे होत आहेत. शहरातील प्रत्येक रस्त्यावर मेथी, कोथिंबिरीचे ढीग लावून विक्रेते, प्रसंगी शेतकरी त्यांची विक्री करत आहेत. आवक प्रचंड झाल्याने अवघ्या २-३ रुपये जुडी या दराने विक्री होत आहे.
धुळे जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 5:54 PM
आवक वाढीचा परिणाम : मेथी, कोथिंबीरीची जुडीने विक्री
ठळक मुद्देआवक वाढल्याचा परिणाम मेथी, कोथिंबिरीची २-३ रूपये दराने विक्री वांग्याच्या १२ किलोच्या गोणीस अवघा ५० रुपये भाव