धुळे : गायीच्या दूधाला ३० तर म्हशीच्या दूधाला ५० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी नमो नमो संघटनेने केली आहे़संघटनेच्या पदाधिकारी जयश्री धनगव्हाळ, सुवर्णा मनोज बोरसे, ललिता नंदू पाटील, मोनिका सूर्यवंशी, माधुरी पाटील, नयना सोनार आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले़कोरोनाच्या संकटकाळात दूधाचे दर कमी करुन शासनाने शेतकºयांवर अन्याय केला आहे, असा आरोप निवेदनात केला आहे़तसेच ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे निकष व कार्यपध्दती निश्चित करण्याबाबतचा १४ जुलैचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी करणारे दुसरे निवेदनही या महिला पदाधिकाºयांनी दिले आहे़लोकशाहीमध्ये ग्रामपंचायत ही महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था असून वित्त आयोगाचा मोठा निधी प्राप्त होतो़ त्यामुळे कार्यकर्त्यांची सोय करण्याची शासनाने हा अध्यादेश काढला आहे, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ तो रद्द करण्याची मागणी केली आहे़
दूधाला हमीभाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 9:46 PM