धुळे : देवपूर शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नये या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळ्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचे युवा सेनेकडून स्वागतच आहे; परंतु शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याला तीव्र विरोध आहे.महाराष्ट्र राज्यात तंत्रशिक्षण विकसित करण्यासाठी दांडेकर समितीने प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एका शासकीय तंत्रनिकेतनची शिफारस केली आहे. धुळ्यातील विद्याथ्र्याना व जनतेला विश्वासात न घेताच शासकीय तंत्रनिकेतन बंदचा निर्णय लादला गेलेला आहे. एकीकडे शासन शासकीय तंत्रनिकेतन बंदचा निर्णय घेते, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच मुक्ताईनगरला शासकीय तंत्रनिकेतनला परवानगी दिली आहे. असा दुजाभाव सरकार का करत आहे? कृषी विद्यापीठाचा प्रश्नही शासनाने प्रलंबित ठेवला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उपकेंद्र जागेचा ठरावही विखंडित केला आहे. विद्याथ्र्याच्या विरोधात निर्णय घेणा:या सरकारचा आम्ही निषेध करतो, असे युवा सेनेच्या वतीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.धुळे जिल्ह्यातील विद्याथ्र्याना कमीत कमी खर्चात रोजगाराभिमुख तंत्रशिक्षण देणारी शासनाची तंत्रनिकेतन ही शासनाची एकमेव संस्था आहे. तंत्रनिकेतन बंदचा निर्णय जिल्ह्यातील विद्याथ्र्यासाठी अन्यायकारक आहे. नागपूर, कराड, जळगाव, संभाजीनगर, सांगली, मुंबई या शहरांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय दोन्ही सुरू आहेत. धुळ्यात शासकीय तंत्रनिकेतनच्या ठिकाणी मोठी जागा उपलब्ध असल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू करण्याची मागणी केली आहे.शासकीय तंत्रनिकेतन बंदचा निर्णय मागे न घेतल्यास यापुढे विद्याथ्र्याना बरोबर घेऊन युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा युवा सेना जिल्हा युवा अधिकारी पंकज गोरे, ऐश्वर्या अग्रवाल, शहर युवा अधिकारी संदीप मुळीक, देवपूर शहर अधिकारी हरीश माळी, उपशहर अधिकारी जितेंद्र पाटील, अमित खंडेलवाल, आकाश शिंदे, नितीन मराठे, विभाग अधिकारी स्वप्नील सोनवणे, नीलेश चौधरी, दीपक देसले, भूषण चौधरी, सागर मोरे, अमोल पटवारी, पराग कुलकर्णी, मयूर बागुल, अजिंक्य मराठे, सागर मोरे, वैभव भदाणे, गौरव बोरा, युवा सेना पदाधिकारी यांनी दिला आहे. या वेळी शासकीय तंत्रनिकेतनचे विद्यार्थीही उपस्थित होते.धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद होणार नाही. विद्याथ्र्याचे नुकसान होऊ देणार नाही. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यात येईल.- डॉ.सुभाष भामरे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
तंत्रनिकेतनसाठी धरणे आंदोलन
By admin | Published: February 10, 2017 12:23 AM