लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लग्नाआधी शरीर संबंध ठेवण्यात नकार दिल्याच्या राग आल्याने लग्न मोडल्याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन देवपूर पोलिसात उपवर मुलासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवर मुलगा हा शहादा येथील राहणार आहे. याप्रकरणी देवपूरमधील एका अपार्टमेंटमध्ये राहणाºया २१ वर्षीय मुलीने देवपूर पोलिसात सोमवारी फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, पीडित तरुणी आणि शहादा येथील मयूर वसंत चव्हाण यांचे लग्न ठरले होते़ मयूर हा २ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मोटारसायकलीने या तरुणीच्या घरी आला़ लग्न जमलेले असल्याने त्याने तिच्या घरी मुक्काम केला़ यानंतर दुसºया दिवशी तरुणीला मोटारसायकलवर बसवून फिरण्यासाठी बाहेर घेवून गेला़ दोंडाईचाजवळ एका हॉटेलवर थांबून त्यांनी चहापाणी घेतले़ यानंतर मयूरने त्या तरुणीला लॉजवर घेऊन जाण्याचा हट्ट धरला़ मात्र, तरुणीने याला नकार दिला़ त्यामुळे त्याने तिला शहादा येथील आपल्या घरी नेले़ घरी देखील त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली़ तिने नकार देताच दोघांमध्ये वाद झाले़ ते वाद विकोपाला गेले़ त्यानंतर लग्न मोडण्याची धमकी त्याने दिली़ या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणी आपल्या घरी परत आली़ शरीर सुखाची मागणी फेटाळल्यामुळे मयूर याने आपल्याला मुलगी आवडत नाही़ ती सिगारेट पिते असे खोटे सांगून लग्न मोडले़ तसेच २ लाखांचा हुंडा मागितला़ तरुणीच्या वडिलांना घरी बोलावून धक्काबुक्की केली़ याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन संशयित मयूर वसंत चव्हाण, वसंत बाबुलाल चव्हाण, पुष्पाबाई वसंत गुरव (सर्व रा़ शहादा, जि़ नंदुरबार) आणि बन्सीलाल बाबुलाल गुरव (रा़ पाटकर नगर, देवपूर) या चौघांविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदविण्यात आला़
लग्नाआधी शरीर सुखाला नकार उपवरासह चौघांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:15 PM