ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.24 : तालुका पोलिसांनी चित्ताेड शिवारात छापा टाकून गावठी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला़ घटनास्थळी गावठी दारूसह कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण 1 लाख 34 हजार रूपयांचा मुद्येमाल बेवारस मिळून आला़ शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली़ याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसाने यांच्यासह पथकाने शनिवारी सकाळी चित्ताेड शिवारात छापा टाकला़ तेथे नाल्याकाठी 200 लिटर क्षमतेचे 21 ड्रम आढळून आल़े त्यात आठ ड्रममध्ये कच्चे रसायन व 60 लिटर तयार दारू असा एकुण 1 लाख 34 हजार 60 रूपये किंमतीचा मुद्येमाल आढळून आला़ पथकात उपनिरीक्षक स्वप्नील कोळी, एऩ ए़ रसाळ, सैंदाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ओंकार गायकवाड, ह़ेकाँ राजेंद्र मोरे, पो़ना सतिष कोठावदे, पो़काँ़ सचिन माळी यांचा समावेश होता़
साक्रीतही कारवाई
साक्री पोलिसांनी शनिवारी सकाळी गणेशपुर रोडजवळ नदी पात्रालगत एका पालापाचोळा असलेल्या शेडमध्ये सुरू असलेल्या गावठी दारू अड्डयावर कारवाई केली़ तेथे 78 हजार रूपये किंमतीच्या तयार दारूसह रसायन व इतर साहित्य मिळून आल़े ते जागीच नष्ट करण्यात आल़े ही कारवाई पोलीस निरीक्षक आऱ एस़ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार तसेच धनराज पाटील, प्रकाश सोनवणे आदींनी केली़ याप्रकरणी साक्री पोलिसात एकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.