ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि. 5 - तालुक्यातील जातोडे येथील दादाजी ओंकार इहावले या तलाठय़ाने शेतजमिनीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा बोजा कमी करण्यासाठी 300 रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी 5 रोजी सकाळी 11़30 वाजता रंगेहात अटक करण्यात आली. तक्रारदाराचे जातोडे गावाच्या शिवारात गट नंबर 167 क्षेत्र 2 हेक्टर 28 आर अशी शेतजमीन आह़े या शेतजमिनीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा 75 हजार रूपयांचा बोजा होता़ तक्रारदारांनी सदरचा बोजा मार्च 2016 मध्ये तो भरून निरंक केला़ सदर शेतजमिनीच्या 7/12 उता:यावरील बोजा कमी करण्यासाठी तलाठी दादाजी ओंकार इहावले यांनी 300 रूपयांची मागणी केली़ परंतु तक्रारदाराने तलाठय़ास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली़
तक्रारीच्या अनुषंगाने पंच साक्षीदार पडताळणी करून तलाठी इहावले यांनी शेतजमिनीवरील बोजा कमी करण्यासाठी 300 रूपयांची लाचेची मागणी केल्याचे ध्वनीमुद्रीत झालेल्या संभाषणावरून निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली़ शिरपूर शहर पोलीस ठाण्यात प्ऱप़अधिनियम सन 1988 चे 7, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करून तलाठय़ास अटक करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ़पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शत्रुघA माळी, पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक पवन देसले, जितेंद्र परदेशी, किरण साळी, संदीप सरग, देवेंद्र वेन्दे, सतीष जावरे, कैलास शिरसाठ, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, सुधीर सोनवणे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली़