शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

...तर मनपाचा विकास निधी रोखणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 4:37 PM

हगणदरीमुक्तीचे आव्हान : पालकमंत्र्यांना माहिती होणार सादर, महिन्याचा ‘अल्टीमेटम’

ठळक मुद्देविभागीय सल्लागार नियुक्त़ ़़़शहरांच्या हगणदरीमुक्तीचा दर्जा राखण्यासाठी ड वर्ग महापालिका आयुक्तांनी गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग पथकात सहभागी व्हावे व अहवाल द्यावा, असे आदेशात नमुद आहे़विभागीय समन्वयक व विभागीय सल्लागार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात समन्वयक म्हणून नाशिक विभागासाठी मधुरा मायंदे तर विभागीय सल्लागार म्हणून सुधाकर बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत १५ मे २०१५ पासून राज्यभरात हगणदरीमुक्तीची मोहिम राबविण्यात येत आहे़ त्यानुसार मनपानेही शहर हगणदरीमुक्तीत चांगले योगदान दिले असले तरी हगणदरीमुक्तीचा दर्जा कायम राखल्याचा अहवाल शासनाला दररोज द्यावा लागणार आहे़ अन्यथा २०१७-१८ मध्ये शासनाकडून दिला जाणारा विकास निधी न देण्याचा इशारा शासनाने दिला आहे़४४ ठिकाणे हगणदरीमुक्तशहर हगणदरीमुक्त करण्यासाठी मनपाने ४४ ठिकाणे निश्चित केली होती, त्याठिकाणी हगणदरीचे प्रमाण सर्वाधिक होते़ त्यानंतर शासनाच्या वेळोवेळी आलेल्या आदेशांनुसार व वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणे हगणदरीमुक्त करण्यात आली असून या ठिकाणी केंद्र व राज्य शासनाच्या समित्यांकडून तपासणीही झाली व मनपा हगणदरीमुक्त घोषीत झाली आहे़अन्यथा शिस्तभंगाची कार्यवाहीस्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे़ या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास सर्व संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे़शौचालयांची देखभाल दुरूस्तीसार्वजनिक शौचालयांचा मार्ग, वीज, पाणी या सुविधा उपलब्ध करून सार्वजनिक शौचालये वापरण्यायोग्य असल्याचा अहवाल शासनाला १५ सप्टेबरपर्यंत द्यावा लागणार असल्याने अवघे प्रशासन महिनाभर केवळ शहर स्वच्छतेवर भर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीची जबाबदारी काही सुयोग्य संस्थांवर सोपविली जाणार असून त्यात महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार आहे़ शहरात सुधारणा आवश्यकशहरात उघड्यावर शौच करणाºयांवर कारवाईसाठी गेल्या दोन वर्षात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात आले आहे़ मात्र गेल्या सहा महिन्यात या उपाययोजना जवळपास थंडावल्याने उघड्यावर जाणाºयांची संख्या वाढत असल्याचे दिसते़ त्यात पांझरा नदीपात्रात उघड्यावर शौचास जाणाºयांची संख्या जास्त असते़ त्यामुळे यापूर्वी शहर स्वच्छतेत देशात १२३  वा व महाराष्ट्रात १० वा क्रमांक मिळविणाºया मनपाला आता खºया अर्थाने स्वत:ला सिध्द करावे लागेल़ महापालिकेला १४ व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे़ त्यामुळे सार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासह हगणदरीमुक्तीसाठी मनपाला परिश्रम घ्यावे लागतील़‘व्हॉटस् अ‍ॅपवर डेली रिपोर्टिंग’़़़शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नेमण्यात आलेल्या गुडमॉर्निंग व गुड इव्हिनिंग पथकांमध्ये स्वत: आयुक्तांनी सहभागी व्हावे, असे शासन आदेशात नमुद आहे़ त्याचप्रमाणे वस्तुस्थिती दर्शक अहवाल दररोज व्हॉटस् अ‍ॅपवर अपलोड करावे लागणार आहेत़ सर्व शहरांचे अहवाल विभागीय आयुक्तांनी शासनाच्या प्रधान सचिवांना व्हॉटस् अ‍ॅपवर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यामुळे शहरातील हगणदरीमुक्तीची वस्तुस्थिती शासनापर्यंत पोहचणार आहे़ शौचालयांची स्थिती सुधारा़़़शासनाच्या नवीन आदेशानुसार सार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यात सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे, शौचकुपाची भांडी सुस्थितीत ठेवावी़ पाणी, वीज यांसारख्या सुविधा त्याचप्रमाणे सार्वजनिक शौचालयांकडे जाणाºया रस्त्यांची स्थिती सुधारावी लागेल़  या सर्व सुधारणांचे जिओ टॅग छायाचित्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागणार आहेत़ शहरात १३८ सार्वजनिक शौचालये आहेत़पालकमंत्र्यांना माहिती द्यावी़़़केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी हगणदरीमुक्त शहर हा दर्जा कायम राखल्याबाबत प्रमाणित करून तअसा अहवाल जिल्हाधिकाºयांनी १५ सप्टेबरपर्यंत शासनाला अहवाल सादर करावा, त्याचप्रमाणे हगणदरीमुक्तीची वस्तुस्थिती दर्शक माहिती पालकमंत्र्यांना द्यावी, असेही शासन आदेशात नमुद आहे़