शिरपूर : बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असायला पाहिजे हा एक शब्द वापरल्यामुळे मला बाजूला सारण्यात आले़ राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर स्वत: साठी काही एक मागणी न करता खान्देशातील रखडलेले सिंचन प्रकल्पांना वेग आला पाहिजे, ते सुरू झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली़ भाजपाने दुर्लक्ष केल्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास खुटला, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.शिरपूर येथे मनो मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे, डॉ़. जितेंद्र ठाकूर, डॉ़ उत्तमराव महाजन, डिगंबर माळी, डॉ़ मनोज महाजन, तालुकाध्यक्ष रमेश करंकाळ, शहराध्यक्ष युवराज राजपूत, दिनेश मोरे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, लिलाचंद लोणारी, युवराज पाटील, रामकृष्ण महाजन, कनीलाल पावरा, दत्तु पावरा, मिलींद पाटील, निलेश गरूड, संभाजी पाटील, धीरज माळी, परेश शिंपी, सत्यवती पावरा, पंडीत पावरा, प्रशांत भदाणे, ललित वारूडे उपस्थित होते़खान्देशात भाजपाचे अस्तित्व नसल्या सारखे होते. तेव्हा नानासाहेब उत्तमराव पाटलांनी जनसंघाचा दिवा घरोघरी लावण्याचा प्रयत्न केला़ नंतरच्या कालखंडामध्ये घराघरात कमळ पोहचले पाहिजे़ यासाठी खान्देशला एक नव रूप देण्याचा प्रयत्न झाला़ नानासाहेब उत्तमराव पाटील गेलेत़ शेठजी-भटजींचा पक्ष भाजपा ओळखला जात होता, बहुजन समाज यात फार कमी होता़ याला बहुजन समाजाचा चेहरा देण्याचे काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय प्रमोद महाजन, नानासाहेब उत्तमराव पाटील, फरांदे, अण्णा डांगे असे कितीतरी नेत्यांनी केलेत़ त्यांच्यामुळेच भाजपा आज बहुजन समाजाचा चेहरा घेवून उभी आहे़ सत्तेमध्ये आल्यानंतर नेतृत्व आपल्या हातांमध्ये ठेऊन फक्त बहुजन समाजाचा वापर केला गेला़ असेही खडसे यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे हेमराज राजपूत यांनी पक्षात प्रवेश केला़कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहुल साळुंखे तर प्रास्तविक रमेश करंकाळ यांनी केले़
भाजपामुळेच उत्तर महाराष्ट्राचा विकास खुंटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 3:12 PM