लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर दगडफेक झाल्यानंतर रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मालेगाव रोडवरील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ आमदार गोटे अजूनही रूग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे़ दरम्यान, गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली? असा प्रश्न पत्राव्दारे केला आहे़आमदार गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे की, आपणावर विश्वास ठेवला त्याची परतफेड आपण विश्वासघात करून केली़ ४७ महिन्यांच्या आमदारकीच्या कालखंडात मी काय चूक केली, ते सांगा़ आपण मला दिलेला एकही शब्द पाळला नाही, हे सत्य स्विकारण्याचे धाडस दाखवाल का? जर आपणास ऐनवेळी आयात उमेदवारांना पक्षाची उमेदवारी देण्याचा निर्णय घ्यायचा होता तर एक बुथ पंचवीस युथ, पन्नाप्रमुख वगैरे कामे पक्षाच्या कार्यकर्त्यांना का करायला लावली? असा प्रश्न आमदार गोटे यांनी विचारला आहे़ आपले सरकार आहे, खोट्या केसेस दाखल करू मला हैराण करा, माझ्या शुभेच्छाच आहेत, असेही गोटे यांनी म्हटले आहे़ दरम्यान, आमदार गोटे हे रात्रीपासून मालेगाव रोडवरील खासगी रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ ११ वाजेनंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे़
Dhule Municipal Election 2018 : देवेंद्रजी, विश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?- अनिल गोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:59 AM
मुख्यमंत्र्यांना खुले पत्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गोटे रूग्णालयात दाखल
ठळक मुद्देआमदार गोटे रात्रीपासून रूग्णालयात दाखलविश्वासाची परतफेड विश्वासघाताने का केली?सत्य स्विकारण्याचे धाडस दाखवा