शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

रूप पाहोनी गजाननाचे भक्तगण प्रसन्न झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 10:36 PM

धुळे येथे ‘गण गण गणात बोते’ चा गजर, दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी; भजनांनी रंगला प्रकट दिनाचा सोहळा

ठळक मुद्देपहाटे अभिषेक, महाआरती दिवसभरात हजारो भाविकांनी घेतले दर्शनपिठले-भाकरी, ठेचा, बुंदीच्या प्रसादाचे वाटप 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बुधवारी वाडीभोकर रोडवरील संत गजानन महाराज मंदिरात  भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याने दुपारपर्यंत हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे या प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पहाटे पाच वाजता ‘श्रीं’ च्या मूर्तीस अभिषेक, पूजन करण्यात आले. साडेअकरा वाजता धर्मदाय आयुक्त वर्षा मिश्रा, राम लिप्ते  यांच्याहस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, मंडळाचे अध्यक्ष गोपाळ केले व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. मंदिराच्या प्रांगणात सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उन्हापासून संरक्षणासाठी प्रांगणात भव्य मंडप टाकण्यात आलेला होता. दर्शनासाठी महिला व पुरूष यांच्याकरीता बॅरिकेट्स लावून स्वतंत्र व्यवस्था केलीली होती. मंदिराच्या प्रांगणात विविध महिला भजनी मंडळांकडून भजने सादर करण्यात येत होती. यानिमित्ताने मंदिरात आंब्याच्या पानांचे मंगल तोरण व झेंडूच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. तसेच मंदिराच्या बाहेर व आत काढण्यात आलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. प्रकट दिनानिमित्त होणाºया विविध कार्यक्रमांसाठी अपूर्व उत्साह पहावयास मिळाला. पहाटेपासून महिलांनी सडासंमार्जन करून अंगणात आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या. विविध परिसरातील महिला भजनी मंडळांचा उत्साहसुद्धा वाखाणण्याजोगा  होता.  मंदिराच्या बाहेरील ओट्यावर सकाळी ९ वाजेपासून जिल्ह्यातील विविध महिला भजनी मंडळांच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.  या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, रेणुका भजनी मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ, श्री मुक्ताई भजनी मंडळ, श्री तुळजाभवानी भजनी मंडळ (गोराणे, ता. शिंदखेडा) व श्री एकता भजनी मंडळाच्या महिलांनी सहभाग घेतला होता. संध्याकाळी ६ वाजता चित्रकुट संस्थानचे मंगलनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. यासह दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी मंदिरात दिसून आली. प्रकट दिन सोहळ्यासाठी शहरातील सर्व भागातून मंदिराकडे जाणाºया भाविकांमुळे संपूर्ण वाडीभोकर रस्ता परिसरात चैतन्याचे वातावरण पसरल्याचे दिसत होते. संध्याकाळी उशीरापर्यंत हा सिलसिला सुरू होता.