लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जळगाव घरकूल प्रकरणातील लवादाचे काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ जे़ कोचर यांची शनिवारी धुळेन्यायालयात सरतपासणी घेण्यात आली़ आता या प्रकरणी पुढील कामकाज सोमवार १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे़ जळगाव घरकूल प्रकरणी धुळ्यातील विशेष न्यायालयात न्यायाधीश डॉ़ सृष्टी नीळकंठ यांच्यासमोर कामकाज सुरु आहे़ उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आऱ जे़ कोचर यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलविण्याबाबत युक्तीवाद झाला होता़ त्यानंतर त्यांना घरकूल प्रकरणातील साक्षीसाठी शनिवारी बोलाविण्यात आले़ यावेळी संशयित राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी उपस्थित होते़ अॅड़ प्रमोद पाटील यांनी माजी न्यायमुर्ती कोचर यांची सरतपासणी घेतली़ त्यांना अॅड़ जितेंद्र निळे यांनी सहकार्य केले़ दिवसभर त्यांची सरतपासणी झाल्यानंतर सायंकाळी सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी त्यांची उलट तपासणी सुरु केली आहे़ सायंकाळ झाल्यामुळे सुरु झालेली उलट तपासणी तहकूब करण्यात आली़ सोमवार १९ नोव्हेंबर रोजी पुढील कामकाज होणार आहे़ यावेळी अॅड़ एस़ आऱ वाणी, अॅड़ अबरार शेख उपस्थित होते़
धुळ्यात माजी न्यायमूर्तींची झाली सरतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 7:04 PM
जळगाव घरकूल : सोमवारी उलटतपासणी
ठळक मुद्देमाजी न्यायमूर्तींची झाली सरतपासणीसोमवारी होणार उलटतपासणी