धुळे : शेतकरी धर्मा पाटील यांना रोहयो मंत्री जयकुमार रावळ यांच्यामुळे आत्महत्या करावी लागली. रावलांनी फळबाग लावून भूसंपादनात कोट्यवधीचा मोबदला मिळविला. विरोध केला तर पोलिसांची मदत घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल केला, असे सांगत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलीक यांनी रावळ यांच्यावर निशाणा साधला.मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी मलिक हे धुळ्यात आले आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, शहरात भाजपने गुंडांना उमेदवारी दिली आहे. हे त्यांच्याच पक्षाचे आमदार अनिल गोटे सांगत आहेत.सभा उधळण्याची धमकीदेणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हामहापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, म्हणून आमदार गोटे यांची सभा उधळून लावेल, अशी धमकी आयेशा बानो या महिलेने दिली होती. याप्रकरणी देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मा पाटील आत्महत्येस जयकुमार रावळ जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 05:01 IST