लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महामार्गावर संशयितरित्या उभ्या असणाºया ट्रकची विचारपूस करण्यात आली़ चालकाकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्यामुळे ट्रकमधील डांबर चोरीचा असल्याचा संशय पोलिसांना आहे़ याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली़ ट्रकसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई मोहाडी पोलिसांनी केली़ मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, कर्मचारी श्याम निकम, युवराज पाटील, प्रमोद नंदेवार हे पथक मुंबई आग्रा महामार्गावर रात्रीची गस्त घालत होते़ हॉटेल रेन्सीडेन्सी पार्कसमोर एमएच ०४ सीए ६१३० क्रमांकाचा ट्रक संशयितरित्या उभा असलेला पथकाला दिसला़ ट्रक चालक अल्ताफ अहमद अब्दुल हमीद शेख (३८) आणि सहचालक शेख यासीन शेख इस्माईल (१९) दोघे रा़ मालेगाव यांची विचारपूस करण्यात आली़ त्यावर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली़ साहजिकच पोलिसांचा संशय बळावला़ ट्रकची तपासणी केली असता त्यात दीड लाख रुपये किंमतीचे डांबराचे ४० ड्रम आढळून आले़ हा चोरीचा माल असल्याचा पोलिसांना संशय आल्याने ट्रकसह डांबर असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी जप्त केला आहे़ ट्रक चालक, सहचालक यांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला़ घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी श्याम निकम करीत आहेत़ चोरटी वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत़
धुळ्यात डांबराची चोरटी वाहतूक रोखली, ट्रकसह मुद्देमाल ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:41 PM
मोहाडी पोलिसांची पहाटेची कामगिरी : दीड लाखांचे डांबर, ४ लाखांचा ट्रक हस्तगत
ठळक मुद्देमहामार्गावर मोहाडी पोलिसांची कामगिरीचोरीच्या डांबराची वाहतूक करणारा ट्रकसह डांबर हस्तगतमालेगावच्या दोघांना घेतले ताब्यात