निखील कुलकर्णी/आॅनलाईन लोकमतधुळे,दि.१६- एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ़दत्ता ढाले यांना संशोधन क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल ‘डीस्टींग्वीश रिसर्चर अॅवॉर्ड’ नुकताच प्रदान करण्यात आला़ नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ़ एस़टी़ देशमुख यांच्याहस्ते प्रा़ दत्ता ढाले यांना गौरविण्यात आले़एसएसव्हीपीएस महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा़डॉ़ दत्ता ढाले हे मुळचे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या मोरेगावचे़ वनस्पती शास्त्राची गोडी असल्याने त्यांनी याच विषयात उच्च शिक्षण घेतले़ त्यानंतर त्याच विषयात पीएच.डी. मिळविली़ सध्या ते श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या डॉ़ पां़रा़ घोगरे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत़ प्रा़ ढाले हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत पीएच.डी.चे गाईड असून ते राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही काम पाहतात़ प्रा़दत्ता ढाले यांनी औषधी वनस्पती हा संशोधनाचा मुख्य विषय म्हणून निवडला होता़ एखाद्या वनस्पतीला औषधी म्हणून वापरत असतांना त्या वनस्पतीची अचूक ओळख व विशिष्ट प्रकारची वैशिष्ट्ये असावीत, असे ‘भारतीय फारमाकोपिया’ या संदर्भ ग्रंथात नमुद आहे़ परंतु आपल्या भागातील अनेक वनस्पतींचा समावेश या संदर्भग्रंथात आढळत नाही़ त्यामुळे अशा प्रकारच्या वनस्पतींचा सखोल अभ्यास करून त्यांना ‘भारतीय फारमाकोपिया’ या संदर्भ ग्रंथांत स्थान मिळवून देण्यासाठी प्रा़ ढाले यांचे संशोधन कार्य अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे़ त्यांनी १६ विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे़ राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रा़ दत्ता ढाले यांनी ग्रामीण भागात जाऊन तेथील लोकांना औषधी वनस्पतींचे महत्त्व पटवून दिले आहे़
धुळयातील प्राध्यापकास ‘डीस्टींग्वीश रिसर्चर’ पुरस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 6:57 PM
संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी : एसएसव्हीपीएस महाविद्यालयातील दत्ता ढालेंची यशोगाथा
ठळक मुद्देप्रा़ ढाले यांना दोन वेळा बेस्ट पेपर प्रेझेंटेशन, तीन वेळा यंग सायंटीस्ट पुरस्कार, उपक्रमशिल विज्ञान शिक्षक पुरस्कार व आता डीस्टींग्वीश रिसर्चर पुरस्कार मिळाला आहे़प्रा़ ढाले यांनी स्पायसेस अॅण्ड कॉन्डीमेंट्स, महाराष्ट्रातील औषधी वनस्पती संग्रह ही पुस्तके लिहीली आहेत़ आतापर्यंत ५० औषधी वनस्पतींवर अभ्यास करून त्यांनी आपल्या संशोधनाचे राष्ट्रीय व आंतरराष्टÑीय परिषदेत वाचन केले आहे़ संशोधन कार्याचे शोधनिबंधात रूपांतर करून त्यांचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकात केले आहे़ आतापर्यंत प्रा़ ढाले यांचे ७० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत़ ते १५ नियतकालिकांच्या संपादकीय मंडळावरही काम पाहतात़