आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले प्रमाणित करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी हे सक्षम वैद्यकीय अधिकारी आहे. त्यामुळे कर्मचाºयांची बिले जिल्हा आरोग्य अधिकाºयांनीच मंजूर करावीत. तसेच या संदर्भात काढण्यात आलेले पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे, अशी मागणी महाराष्टÑ जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या धुळे शाखेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जिल्हा परिषद कर्मचाºयांचे वैद्यकीय बिले हे जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे सादर न करता, जिल्हा शल्य चिकित्सक धुळे यांच्याकडे सादर करावीत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट अभिप्राय दिल्यानंतरच वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयकावर कार्यवाही करावी असे पत्र आरोग्य विभागातर्फे १० फेब्रुवारी रोजी काढण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांनी आज सीईओंना निवेदन देवून आपली कैफीयत मांडली.निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे वैद्यकीय बिले प्रमाणित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी हेच सक्षम अधिकारी आहेत.कर्मचाºयांचे वैद्यकीय बिले मंजुरीबाबत राज्यातील इतर जिल्ह्यात ज्याप्रमाणे कार्यवाही होते, तशीच धुळे जिल्हा परिषदेतही होणे आवश्यक असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.वैद्यकीय खर्चामुळे कर्मचारी अगोदरच आर्थिक अडचणीत असतात. बिले मंजुरीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविल्यास मंजुरीस उशिर होऊन कर्मचारी अधिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाºयांची वैद्यकीय बिले हे जिल्हा आरोग्य अधिकाºयांनीच मंजूर करावीत. तसेच यासंदर्भात काढण्यात आलेले पत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी महासंघाचे सरचिटणीस संजय कोकणी, विभागीय सहसचिव उज्वल भामरे, अध्यक्ष कल्पेश माळी, उपाध्यक्षा किरण सोनवणे, विलास मालचे, रोहीत चौधरी, तुषार पाटील, विकास माळी, प्रविण देसले, प्रभाकर पाटील, जिल्हा संघटक डी.बी.पाटील, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.टी. भामरे, आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष पाटील आदी उपस्थित होते.
‘डीएचओं’नी वैद्यकीय बिले मंजूर करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:15 AM
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सीईओंना निवेदन
ठळक मुद्देवैद्यकीय बिले जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सादर करण्याचे पत्रकर्मचाºयांची झाली अडचणआरोग्य अधिकाºयानेच बिले मंजूर करण्याची मागणी