- सुनील साळुंखेशिरपूर (धुळे) - कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने दोन वाहनांना उडविल्यानंतर कंटेनर हॉटेल तोडून बाहेर पडला. या भीषण अपघातात १० जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर बायपासवर मंगळवारी सकाळी साडेदहा वााजेच्या सुमारास घडला. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, मदत कार्य सुरू झालेले आहे. दरम्यान, या आपघातातील मृतांचा आकडा वाढून आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने या कंटनेरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडविले. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॅाटेलमध्ये हा कंटेनर घुसून बाहेर पडला. या भीषण अपघातात हॉटेल परिसरात व हॅाटेलमध्ये असलले जवळपास १० जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.. तसेच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहे.