ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 19 - महापालिकेने 2003 मध्ये खरेदी केलेले 250 केव्हीए (किलोव्होल्ट अॅम्पीअर) क्षमतेचे चालू स्थितीतील जनरेटर महापालिकेत तब्बल 10 वर्षापासून धुळखात पडून आह़े पाण्याच्या पंपींगसाठी खरेदी करण्यात आलेल्या या जनरेटरला लागणारा खर्च परवडत नसल्याने जनरेटरचा वापर होत नसल्याचे मनपा सुत्रांनी सांगितल़ेआर्थिकदृष्टय़ा महागातमहापालिकेचा वीजवापर केवळ 25 किलोव्ॉट आह़े वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी मनपाने अन्य एक 10 किलोव्ॉट क्षमतेचे जनरेटर खरेदी केले होत़े मात्र ते देखील भंगार अवस्थेत असल्याने मनपाने आता नवीन जनरेटर खरेदीचा निर्णय घेतला असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आह़े तर दुसरीकडे, पूर्वी मनपाकडे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महावितरणचे पुरेसे फिडर उपलब्ध नव्हत़े सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने पाणीपुरवठय़ात अडचणी निर्माण होत होत्या़ त्यामुळे 2003 मध्ये महापालिकेने नवीन जनरेटरची खरेदी केली़ मात्र त्यानंतर महावितरणचे फिडर बसविल्याने मनपाला जनरेटरची गरज भासणे बंद झाल़े शिवाय सदर जनरेटरला एका तासाला 25 लिटर डिङोल लागत असून मनपाला आर्थिकदृष्टय़ा देखील ते परवडणारे नाही़ निविदेला प्रतिसाद मिळेना!महापालिका कार्यालयात सध्या वीजपुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी यंत्रणा उपलब्ध नाही़ त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांना अंधारातच बसून राहावे लागत़े मनपा कार्यालयाला आवश्यक जनरेटर बसविण्यासाठी मनपाने 6 लाख 1 हहजार 213 रूपयांची निविदा तब्बल सहा वेळा प्रसिध्द केली आह़ेमहापालिकेत 10 वर्षापासून धुळखात पडून असलेले भले मोठे जनरेटर लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्थलांतरीत करणार असल्याचे मनपा सुत्रांकडून सांगण्यात आल़े मात्र चालू स्थितीत असलेल्या या जनरेटरचा वापर नेमका करायचा कुठे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आह़े या जनरेटरने मोठी जागा देखील व्यापली असून त्यामुळे अधिका:यांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध नाही़