आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करावा अशी शिक्षक संघटनांची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केली आहे. आता जि.प. प्राथमिक शाळा एकतास उशिराने म्हणजे सकाळी १०.४५ वाजेपासून भरणार आहे. याची अमलबजावणी ९ जुलैपासून होणार आहे. शिक्षकांनी या निर्णयाचेस्वागत केले आहे.जिल्ह्यात ११०३ जि.प.च्या शाळा आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा या सकाळी १०.४५ ते सायंकाळी पाच यावेळेतच भरत होत्या. मात्र जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेले गंगाथरन देवराजन यांनी जि.प.शाळांची वेळ सकाळी ९.४५ ते ४ अशी केली होती. कोणालाही विश्वासात न घेता शाळांची वेळ बदलविण्यात आल्याने, अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. शाळेची वेळ बदलावी यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने सारखा पाठपुरावा केला होता. तसेच या संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभेत शाळांच्या वेळेत बदल करण्याचा ठराव देखील करण्यात आलेला होता. शिक्षक संघटनांची मागणी व सभेने केलेले ठराव लक्षात घेऊन सीईओंनी प्राथमिक शाळेची वेळ बदल करण्यास ५ जुलै रोजी मान्यता दिलेली आहे. त्याची अमलबजावणी ९ जुलैपासून होणार आहे. बदलेल्या वेळापत्रकानुसार सोमवार ते शुक्रवार दरम्यान शाळा सकाळी १०.४० ते सायंकाळी ५.१० यावेळेत भरणार आहे. तर शनिवारी सकाळी ७ ते १०.३० यावेळेत शाळा भरणार आहेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रदीप शिंदे यांनीही शाळा वेळेत बदल झाल्याचे सांगितले.
धुळे जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत झाला बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:41 AM
९ जुलैपासून होणार अंमलबजावणी : मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे आदेश
ठळक मुद्देगेल्या वर्षापासून जि.प.शाळांची वेळ ९.४५ केली होतीवेळेत बदल करण्याची होती मागणी९ जुलैपासून सकाळी १०.४० वाजता शाळा भरणार