लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात पांझरा नदीकाठी सुरू असलेले रस्त्यांचे काम थांबले पाहिजे, यासाठी धार्मिक विव्देषाचे बीजरोपण करून दंगल घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप आमदार अनिल गोटे यांनी केला आहे़शहरातील पांझरा नदीकाठी सुरू असलेल्या रस्त्यांचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे़ जुने धुळे भोईवाड्यातील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी अडीच एकर जागा, जिल्हाधिकारी निवासस्थानाशेजारील कारागृहाची जागा मुख्यमंत्र्यांनी रस्त्यासाठी दिली आहे़ शहरात होत असलेल्या या विकास कामांना विरोध करीत अनेकांनी तक्रारी केल्या पण त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही़ त्यामुळे आता धार्मिकतेचे भांडवल करून विव्देशाचे बीजारोपण करण्यात येत आहे़ गेल्या दोन निवडणूकांपूर्वी झाल्याप्रमाणे यंदाही दंगल घडविली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ शहरातील नागरिकांना परिस्थिती अवगत करून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे, असे गोटे यांनी म्हटले आहे़
धुळे शहरात धार्मिक दंगल घडविण्याचे कारस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 9:36 PM
आमदार अनिल गोटेंचे पत्रक, विरोधकांवर टिकास्त्र
ठळक मुद्दे-पांझरा नदीकाठच्या रस्त्यांचे काम थांबविण्याचे प्रयत्न-गेल्या दोन निवडणूकांपूर्वी दंगलीचा इतिहास-लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला देतोय माहिती