आॅनलाइन लोकमतधुळे : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार हा कार्यक्रम राबविण्यात येत असून, २०१८-१९ या वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे १५७ गावांमध्ये ४५० कामे प्रस्तावित केलेली आहे. त्यासाठी ३ कोटी २९ लाख रूपये खर्च लागण्याची शक्यता आहे.राज्यात सतत उदभवणारी टंचाई परिस्थिती विचारात घेऊन सर्वांसाठी ‘पाणी टंचाईमुक्त महाराष्टÑ २०१९’ अंतर्गत राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतलेले आहे. पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे हे तिसरे वर्ष आहे. सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील १२९ गावांची निवड करण्यात आली होती. या गावामध्ये एकूण ३ हजार ६०५ कामे मंजूर करण्यात आली होती. पैकी सर्व कामे पूर्ण झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. २०१८-१९ मध्ये ४५० कामे प्रस्तावित जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात जलयुक्तच्या कामांसाठी १५७ गावांची निवड करण्यात आलेली आहे. यात नवीन साठवण बंधारे बांधणे, रिजार्ज बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे साठवण बंधारे, गाव तलाव, पाझर तराव, गाळ काढणे, खोलीकरण करणे आदी कामांचा समावेश करण्यात आलेला आहे.सर्वाधिक कामे साक्री तालुक्यातया १५७ पैकी सर्वाधिक कामे साक्री तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या तालुक्यात ७३ गावांमध्ये २५ नवीन साठवण बंधारे, ४० रिचार्ज बंधारे, ५४ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, २९ गाव तलाव, पाझर तलाव व १६ गाळ काढणे,खोलीकरण करणे अशी १६४ कामे प्रस्तावित आहेत. त्या खालोखाल धुळे तालुक्यातील ४२ गावांची निवड करण्यात आलेली असून, त्यात ९ नवीन साठवण बंधारे, ६९ रिचार्ज बंधारे, ६१ कोल्हापूर पद्धतीचे साठवण बंधारे, १६ गाव तलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याची कामे अशी एकूण १५५ कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.दुष्काळाची तीव्रता यावर्षी सर्वाधिक शिंदखेडा तालुक्यात आहे. मात्र या तालुक्यातील फक्त १९ गावांची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात फक्त ७ नवीन साठवण बंधारे, ४ रिचार्ग बंधारे, व १३ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, २२ गाव तलाव, पाझर तलाव व ६ ठिकाणचे गाळ काढणे खोलीकरण अशी एकूण ५२ कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. लवकरच सुरू होणार कामे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. १५ जून पर्यंत ही कामे पूर्ण करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.आराखडा तयारप्रस्तावित ४५० कामांपैकी ३६९ कामांचे अंदाजपत्रक तयार आहे. केवळ ८१ कामांचे अंदाजपत्रक बाकी असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान ही कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.
धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवारसाठी १५७ गावांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:30 AM
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागातर्फे २०१८-१९ या वर्षासाठी ४५० कामे प्रस्तावित
ठळक मुद्देलघुसिंचन विभागातर्फे ४५० कामे प्रस्तावित३ कोटी २९ लाख रूपये खर्च लागणार३६९ कामांचे अंदाजपत्रक तयार