आॅनलाइन लोकमतधुळे : महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी व दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. इयत्ता दहावीसाठी ३ हजार ५८५ तर इयत्ता बारावीसाठी २ हजार ४६ विद्यार्थी असे दोन्ही परीक्षा मिळून ५ हजार ६३१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत.फेब्रुवारीमध्ये झालेल्या बारावीचा परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहीर झाला. बारावीसाठी जिल्ह्यातून २४ हजार १९३ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी २० हजार २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ३ हजार ९८८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.तर दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर झाला होता. जिल्ह्यातून २८ हजार ३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ६ हजार ४१८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते.दहावी, बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने तत्काळ पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय तीन वर्षांपासून अंमलात आणला आहे. यापूर्वी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणारी पुरवणी परीक्षा यावर्षी जुलै महिन्यात होत आहे. या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी प्रवेश घेता येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर केले आहे.त्यानुसार दहावी बारावीची पुरवणी परीक्षा १७ जुलै ते ३ आॅगस्ट २०१९ दरम्यान होणार आहे.बारावीसाठी २ हजार ४६ विद्यार्थीबारावीची परीक्षा जिल्ह्यातील चार केंद्रावर होईल. यात धुळे शहरातील २ व साक्री, शिंदखेडा येथे प्रत्येकी एक-एक केंद्र आहे. त्यापैकी जिजामाता कन्या विद्यालयात धुळे येथे ७४४, श्री.तु.ता.खलाणे महाजन हायस्कूल धुळे येथे ५७०, न्यू इंग्लिश स्कूल साक्री येथे ३५४, तर एस.एस.व्ही.पी.एस. संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे ३७८ असे एकूण २ हजार ४६ विद्यार्थी परीक्षा देतील.दहावीसाठी ३५८५ विद्यार्थीदहावीची परीक्षा धुळ्यातील दोन, व साक्री, शिरपूर व शिंदखेड्यातील प्रत्येकी एक-एक अशा पाच केंद्रावर ३ हजार ५८५ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत.दोन भरारी पथकांची नियुक्तीपरीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळातर्फे दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.तीन ठिकाणी कस्टडीप्रश्नपत्रिका पुरवठा करण्यासाठी व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी जिल्ह्यामध्ये तीन कस्टडीची व्यवस्था करण्यात आली आहे. धुळे, साक्री, व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी एक-एक कस्टडीची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.एकही उपद्रवी केंद्र नाहीजिल्ह्यात एकाही ठिकाणी उपद्रवी केंद्र नसल्याचे सांगण्यात आले.
धुळे जिल्हयात दहावी-बारावी परीक्षेसाठी ५,६३१ विद्यार्थी प्रविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:45 AM
१७ जुलैपासून होणार परीक्षेला सुरूवात, दोन भरारी पथकांची नियुक्ती
ठळक मुद्दे१७ जुलैपासून होणार परीक्षेला सुरूवतदोन भरारी पथकांची नियुक्तीजिल्ह्यात एकही उपद्रवी केंद्र नाही