शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

धुळे जिल्ह्यात १५ ग्रा.पं.साठी ५९८ अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:54 AM

ग्रामपंचायत निवडणूक : शेवटच्या दिवशी झुंबड, सोमवारी छाननी होणार, माघारीनंतर होईल चित्र स्पष्ट 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर/शिंदखेडा  : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी  शिरपूर व शिंदखेडा येथील तहसील कार्यालयांवर झुंबड उडाली होती. उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले. शिरपूर तालुक्यातील ७ ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्य पदांसाठी मिळून  आजअखेर १९५ अर्ज तर शिंदखेडा तालुक्यात सरपंच व सदस्य पदांसाठी मिळून ४०३ अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी या अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. शिंदखेडा : ४०३ अर्ज शिंदखेडा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी ९सरपंच पदाच्या जागेसाठी २७ अर्ज दाखल झाले असुन एकुण ५७ अर्ज दाखल झाल. तर सदस्य पदासाठी ८९ जागांसाठी आज १६६ अर्ज दाखल झाले असून आजअखेर एकुण ३४६ अर्ज शेवटच्या दिवस अखेर दाखल झाले. पिंपरखेडा येथे सरपंच पदासाठी आज ३ अर्ज दाखल झाले आहे एकुण ५अर्ज शेवटच्या दिवसपर्यंत दाखल झाले आहे.तर सदस्य पदाच्या ७जागांसाठी २५ अर्ज,मेथी येथे सरपंच पदासाठीआज ५अर्ज दाखल झाले अखेर दिवस पर्यंत ९अर्ज दाखल झाले तर४प्रभागांसाठी ११जागेसाठी आज १५अर्ज दाखल झाले आहे.शेवटच्या दिवस अखेर एकुण ३४अर्ज दाखल झाले आहे.दाऊळ येथे सरपंच पदासाठी आज २अर्ज दाखल झाले असुन एकुण ६अर्ज दाखल झाले आहेत तर ३प्रभागात ९जागांसाठी ८अर्ज दाखल झाले आज अखेर एकूण ४४ अर्ज दाखल झाले आहे. दभाशी येथे सरपंचपदासाठी आज १अर्ज दाखल केला एकुण ६अर्ज सरपंच पदासाठी दाखल झाले आहे. सदस्य पदासाठी३प्रभागातील ९ जागांसाठी ६ अर्ज तर आज अखेर २८अर्ज दाखल झाले आहेत. मालपुर येथे सरपंच पदासाठी आज ४ अर्ज दाखल झाले असुन एकुण ७ अर्ज दाखल झाले आहेत ६ प्रभागांत १७ जागा असून आज ७६ अर्ज तर एकुण १०६ अर्ज सदस्यपदासाठी, आच्छी येथे सरपंच पदासाठी आज ४ अर्ज तर एकुण ५ अर्ज, सदस्य पदाच्या ७ जागांसाठी १३ अर्ज तर एकुण १५ अर्ज दाखल झाले आहे. विखरण येथे सरपंच पदासाठी दाखल झाले सरपंच पदासाठी सहा अर्ज दाखल झाले असून असून चार प्रभागासाठी ११ जागांसाठी आज अखेर १८ अर्ज दाखल झाले. एकूण ३७ अर्ज दाखल झाले आहेत. डोंगरगाव येथे सरपंच पदासाठी आज ४ अर्ज दाखल झाले असून एकूण ८ अर्ज दाखल झाले आहेत सदस्यपदाच्या तीन प्रभागासाठी साठी सात जागा असून आज २१ अर्ज दाखल झाले आहेत. चिलाणे येथे सरपंच पदासाठी आज दोन अर्ज दाखल झाले असून सरपंचपदासाठी ५ अर्ज दाखल झाले असून चार प्रभागांसाठी ११ जागा असून आज १० अर्ज दाखल झाले असून एकूण २६ अर्ज दाखल झाले आहेत आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती यामुळे तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते तालुक्यातील मालपूर,  विखरण मेथी या गावांमध्ये चुरशीची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत.शिरपूर : १९५ अर्ज शिरपूर तालुक्यात ७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून आजअखेर सरपंच पदासाठी ३४  अर्ज तर सदस्यपदांसाठी १६१ अर्ज असे एकूण १९५ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रा.पं.निहाय दाखल अर्ज असे : सुभाष नगर  ग्रा.पं. - सरपंच- ८, सदस्य - ४५,  भरवाडे ग्रा.पं.- सरपंच- ४, सदस्य - २८, टेंभे बु।। - सरपंच -२, सदस्य- १५, नवे भामपूर ग्रा.पं.- सदस्य - १६, जैतपूर ग्रा.पं. - सरपंच -१ व सदस्य - २६, अजंदे खुर्द ग्रा.पं.- सरपंच -२, सदस्य १२, आढे ग्रा.पं.- सरपंच - ७, सदस्य -१९. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. शनिवारी सरपंच पदांसाठी १५ तर सदस्य पदांसाठी ५८ अर्ज दाखल झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत प्रक्रिया सुरू होती.  सोमवारी दाखल अर्जांची छाननी त्या-त्या तहसील कार्यालयांमध्ये केली जाणार आहे. त्यासह माघारीच्या मुदतीनंतर या ग्रा.पं.मधील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान ग्रा.पं. निवडणुकींमुळे ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीने लढल्या जाणार, हे निश्चित झाले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे