धुळे,दि.21- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवरंजन यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्वच्छतेच्या कामाकडे माझा कटाक्ष राहणार असल्याचे स्पष्ट केले होत़े त्यानुसार रविवार सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा परिषद, चारही पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छता करण्याचा आदेश जारी केला़ त्यानुसार अधिकारी कर्मचा:यांनी रविवारी श्रमदान केल़े
जिल्हा परिषदेतील तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ़ पुरुषोत्तम भापकर यांनी स्वच्छतेच्या कामाकडे सुरुवातीपासून लक्ष केंद्रीत केले होत़े त्यानंतरच्या आलेल्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्गाने स्वच्छतेचा हा कित्ता गिरविला़ धुळ्यात नव्यानेच आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवरंजन यांनी रविवारी जिल्हा परिषद, चारही पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छता मोहिम राबविली जाईल असे स्पष्ट केले होत़े त्या आदेशानुसार रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अधिका:यांसह कर्मचा:यांनी स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभाग नोंदवित श्रमदान केल़े