आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या वर्षापासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला अखेर सुरवात झाली.विशेष संवर्ग १ व संवर्ग २ मधील शिक्षकांसाठी आॅनलाईन विनंती बदली अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यासाठी ११ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेतून देण्यात आली.शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेबरोबरच गतिमानता यावी या उद्देशाने शासनाने गेल्यावर्षी संगणकीय बदली प्रक्रिया धोरण स्वीकारले. त्यात संवर्ग १,२,३,४ तयार करून, त्या पद्धतीने बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र या प्रकियेत बराच गोंधळ असल्याने, गेल्यावर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच होऊ शकल्या नाहीत.२०१८-१९ या वर्षासाठी बदली प्रक्रियेला सुरवात झाल्याने, अनेकवर्षे दुर्गम भागातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. विशेष संवर्ग १ मधील अपंग, सेवाज्येष्ठ, विधवा, गंभीर आाजारी शिक्षकांची तसेच संवर्ग २ मधील पती-पत्नी असलेल्या शिक्षकांसाठी आॅनलाइन विनंती बदली अर्ज भरण्यासाठी पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू केले आहे. या दोन्ही संवर्गातील शिक्षकांनी ११ एप्रिलपर्यंत आपली माहिती भरायची असल्याचे सांगण्यात आले. गेल्यावर्षी संवर्ग एक व २ मध्ये पात्र नसणाºया शिक्षकांनीही आॅनलाईन अर्ज भरले होते. अशांवर काहींनी आक्षेपही घेतले होते. यंदा शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी बदली प्रक्रियेत काही निवडक बदल करण्यात आले आहेत.जिल्ह्यात २३ अवघड क्षेत्रातील शाळाजिल्ह्यात अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या २३ आहे. त्यात धुळे तालुक्यात ६, शिरपूर तालुक्यात १४, शिंदखेडा तालुक्यातील ३ शाळांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात एकही अवघड क्षेत्रातील शाळा नाही.अद्याप बदलीपात्र यादी नाहीराज्यस्तरावरून बदली प्रक्रियेस सुरवात झाली असली तरी जिल्हा परिषद स्तरावरून मात्र अद्याप कसल्याही हालचाली नाहीत. संवर्ग १ मधील शिक्षकांना शाळा निवडता येतील अशा बदलीपात्र शिक्षकांच्या याद्याच अजून जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रसिद्ध झालेल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी होऊ लागली आहे.