आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या गेल्या महिन्यातच यशस्वीपणे पार पडल्या. त्याचबरोबर अवघड गावे निश्चितीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात २३ गावातील जिल्हा परिषद शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आलेला आहे.यात शिरपूर तालुक्यातील १४, धुळे तालुक्यातील ६, व शिंदखेडा तालुक्यातील ३ गावातील जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. साक्री तालुक्यात एकही गाव अवघड क्षेत्रात नाही.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी शिक्षण विभागाने आता सर्वसाधारणक्षेत्र व अवघड क्षेत्र अशी वर्गवारी केली होती. .धुळे जिल्ह्यात ११०३ जिल्हा परिषदेच्या शाळा असून, त्यात साडेतीन हजार पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहे. अवघड क्षेत्रातील काही गावे दुर्गम क्षेत्रात असून, या ठिकाणी रस्ता नसल्याने, बस जाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे शिक्षकांना पायीच जावे लागते.अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी शिक्षण विभागाची बैठक झाली. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना, अभियंता यांना सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना केल्या. झालेल्या सर्वेक्षणानुसार अवघड क्षेत्रातील गावांची यादी चारही तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला सादर केली. त्यात २३ गावांचा समावेश केला आहे. गेल्यावर्षीही एवढ्याच शाळा होत्या.या गावातील जि.प. शाळांचा अवघड क्षेत्रात समावेशशिरपूर तालुका-जि.प.शाळा वरचेरोपमाळ, मालपूरपाडा, कढईपाणी, प्रधानदेवी, साकळीपाडा, कंज्यापाणी, थुवानपाणी, निशानपाणी, पिंपल्यापाणी, टिटवापाणी, खुटमळी, पिरपाणी, कोईडोकीपाडा, न्यू. सातपाणी.धुळे तालुका- जि.प.शाळा कुसुंबा-भिलाटी, हिंगणे, बोरीकाढ, रामनगर, मुळप्रतीपाडा, वैतागवाडी-पिंपरखेड.शिंंदखेडा तालुका- जि.प.शाळा देवकानगर, होळकरवाडी, पावसानगर यांचा समावेश करण्यात आलेला आहे.साक्री तालुक्यातील एकाही शाळेचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आलेला नाही.अवघड क्षेत्रात कामकरण्याकडे कलअवघड क्षेत्रातील गावे मुख्यालयापासून दूर असून दुर्गम भागात आहेत. काही गावातील परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्याठिकाणी शिक्षक जायला तयार नसतात. असे असले तरी अशा गावातील शाळांमध्ये विशेष कामगिरी करू असा काही शिक्षकांना विश्वास असतो. त्यामुळे ते अवघड क्षेत्रातील शाळांची मागणी करीत असतात.
धुळे जिल्ह्यातील २३ शाळांचा अवघड क्षेत्रात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:38 AM