शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षांच्या मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:41 AM

राहत्या घरी घेतला गळफास : कारण अद्याप गुलदस्त्यात

ठळक मुद्दे गळफास घेतल्याचे स्पष्ट   आत्महत्येमागील कारण अस्पष्ट  निखिल झेड. बी. पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी 

धुळे : शहरातील झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या ११ वी विज्ञान शाखेच्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. निखिल सुनील पावरा असे मृताचे नाव असून तो राष्टवादी महिला आघाडीच्या धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांचा मुलगा आहे. १९ जानेवारी  रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. 

शहरातील देवपूर भागात वाडीभोकर रोडवर असलेल्या अभियंता नगरात  ज्योती पावरा यांचे निवासस्थान (प्लॉट नं.२४) आहे. त्या गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील वैजापूर  (तालुका चोपडा) या त्यांच्या माहेरी गेल्या आहेत. बुधवारी (17 जानेवारी) सकाळी निखिलने गळफास घेतल्याचे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याचे वडील सुनील पावरा यांच्या लक्षात आले. 

या प्रकरणी देवपूर पश्चिम पोलीस ठाण्यास खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.  निखिल याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांना कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. कारणाचा तपास केला जात असल्याचे देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी सांगितले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याNCPराष्ट्रवादी काँग्रेस