लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील कारागृहातील बंदिवानांचे आधारकार्ड काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली़ त्यामुळे बंदिवानांना सुध्दा स्वत:ची एक नवी ओळख मिळाली असल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर होते़ कारागृहात येण्याची कोणालाही इच्छा नसते़ पण, या ना त्या कारणाने कारागृहात येण्याचा कटू प्रसंग संबंधितांवर ओढवतो़ एखाद्या प्रकरणात न्यायालयाकडून शिक्षा मिळाल्यानंतर त्याचे स्वरुप लक्षात घेतल्यानंतर कारागृहात बंदिवान येतो़ तो आल्यानंतर त्याची संपूर्ण चौकशी केली जाते़ या ठिकाणी येणाºयांमध्ये गरीबांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे़ काहींकडे तर स्वत:ची ओळख असलेले आधारकार्ड देखील नसते़ न्यायालयाकडून ज्यांना शिक्षा देण्यात आली आहे आणि त्यातील ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशांसाठी आधारकार्ड मोहीम राबविण्याचे आदेश न्यायालयाकडून पारीत झाले़ त्याची अंमलबजावणी धुळे कारागृहात करण्यात आली़ कारागृहात येणाºयांमध्ये सर्वच शिक्षित असतातच असे नाही़ त्यामुळे बंदिवान पुरुष आणि स्त्रीया यांना लिहीता आणि वाचता यावे यासाठी देखील कटाक्षाने लक्ष दिले जात आहे़ कारागृहात आता प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आला आहे़ लवकरच नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु आहे़ कारागृहात येणाºया बंदिवानांचे आधार कार्ड काढण्यात आले आहे़ त्यात २६ पुरुष, २ महिलांचा समावेश आहे़ त्यांच्याकडे आधारकार्ड नसल्याने विशेष मोहीम यासाठी राबविण्यात आली, असे धुळे जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी सांगितले़
धुळे जिल्हा कारागृहातील बंदीवानांना ‘आधार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:53 PM
अभिनव उपक्रम : पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या आधारकार्ड मोहीमेचे स्वागत
ठळक मुद्देजिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव जे़ ए़ शेख यांची मोठी मदत याकामी कारागृह अधीक्षक वैभव आगे यांना मिळाली़कारागृहात वेळोवेळी आरोग्य शिबिर, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान होत असते़ त्यातून बंदिवानांमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरु असतो़