धुळे, दि.14- शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारचा पारा 44 अंशार्पयत पोहचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आह़े
पुढील दोन दिवसात उष्णतेची लाट उत्तर मध्य महाराष्ट्रात येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आह़े शुक्रवारी कमाल तापमान 44 अंश सेल्सीअस नोंदविण्यात आल़े किमान तापमान 19़5 इतके होत़े आद्र्रता सकाळी 19 तर दुपारी 4 इतकीच होती़ गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात याच तारखेला तापमान जवळपास 43 इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते, मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एप्रिल महिन्यात एक ते दोन अंशांची वाढ तापमानात झाली आह़े सध्या राज्यभरात उष्णतेची लाट असून आठवडाभर ही लाट कायम राहण्याची शक्यता आह़े