ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.20 - शहराला पाणीपुरवठा करणा:या जलस्त्रोतांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठय़ाबाबत व उपाययोजनांच्या संदर्भात महापौर कल्पना महाले यांनी सोमवारी मनपा अधिकारी व ओव्हरसियर यांची आढावा बैठक घेतली़ पजर्न्यवृष्टी न झाल्यास निर्माण होणा:या टंचाईसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना महापौर महाले यांनी दिल्या़
शहराला सद्यस्थितीत तापी पाणी पुरवठा योजना, नकाणे तलाव, डेडरगाव तलाव येथून पाणीपुरवठा केला जातो़ सद्यस्थितीत नकाणे व डेडरगाव तलावात अनुक्रमे 40 व 80 एमसीएफटी जलसाठा शिल्लक आह़े मात्र जुलै महिन्यातही पजर्न्यवृष्टी न झाल्यास शहराच्या उर्वरीत भागाला देखील तापी पाणी पुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा करावा लागणार आह़े त्याबाबत महापौरांनी अधिका:यांशी चर्चा करून आढावा घेतला व टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच कृती आराखडा व उपाययोजना करण्याचे आदेश दिल़े अक्कलपाडा धरणातून पाणी घेऊन नकाणे तलाव भरण्यात येत असून त्यादृष्टीनेही पाठपुरावा सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिल़े