आॅनलाईन लोकमतधुळे- महानगरपालिकेच्या १९ प्रभागातील ७३ जागांसाठी रविवारी मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५९.२८ टक्के एवढी होती. दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजता नगावबारी येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरूवात झालेली आहे. पहिला निकाल सकाळी ११ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता असून, निकालाबाबत प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.गेल्या महिन्याभरापासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. यात एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. निवडणूक रिंगणात ३५४ उमेदवार होते. रविवारी शहरातील ४५० केंद्रावर किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान झाले. मतदानाची टक्केवारी ५९.२८ एवढी होती.दरम्यान सोमवारी सकाळी १० वाजेपासून नगावबारी येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीची प्रक्रिया मतदान केंद्रनिहाय १६ फेºयांमध्ये होणार आहे. यासाठी ४५ टेबल लावण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी आहे. साधारणत: ११ वाजेपर्यंत पहिला निकाल जाहीर होऊ शकतो. मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. दरम्यान मतमोजणी केंद्राच्या बाहेर निकाल ऐकण्यासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाºयासह कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. निकाला बाबत शहरवासियांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
धुळे महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:07 AM
सकाळी ११ वाजता पहिला निकाल लागण्याची शक्यता
ठळक मुद्देमहापालिकेच्या निकालाबाबात उत्सुकतासकाळी ११ वाजेपर्यंत पहिला निकाल लागणारपदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरूवात