शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धुळे मनपा निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:27 AM

 १० गावांमधून वाढणार मतदार संख्या, राजकीय समीकरणे बदलणार

ठळक मुद्दे पूर्वी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौ.कि.मी. इतके होते.  हद्दवाढीमुळे ५४़६२ चौ.कि.मी. क्षेत्राची वाढ शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीपासून लागू झाली.

निखिल कुलकर्णी। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहर हद्दवाढीमुळे धुळे महापालिकेच्या निवडणुकीत ३९ हजार मतदारांची भर पडणार आहे़ नगाव वगळता हद्दवाढीतील १० गावांमधून हे मतदार वाढणार असून त्यामुळे ५ नगरसेवक वाढतील़शहर हद्दवाढीची अधिसूचना ५ जानेवारीपासून लागू झाली. त्यामुळे ११ गावांचा धुळे महापालिका क्षेत्रात समावेश झाला आहे़ पूर्वी शहराचे क्षेत्रफळ ४६़४६ चौ.कि.मी. इतके होते. त्यात हद्दवाढीमुळे ५४़६२ चौ.कि.मी. क्षेत्राची वाढ झाली आहे़ त्यामुळे शहराचे एकूण क्षेत्रफळ १०१़०८ चौ.कि.मी. झाले आहे़  त्यामुळे शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे़ शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावांमधील एकूण ३९ हजार ९० मतदार महापालिका निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत़ नगाव वगळता उर्वरित १० गावांमधील मतदारांना प्रथमच महापालिका निवडणुकीत मतदान करता येणार आहे़ त्यात सर्वाधिक मतदार संख्या १७ हजार ३२७ वलवाड, तर सर्वात कमी ८४५ मतदार अवधान गावातून वाढणार आहेत़ मतदानाचा हक्क १८ वर्षे वयाची अट पूर्ण केल्यानंतर मिळत असल्याने त्याखालील लोकसंख्या लक्षात घेतल्यास संबंधित गावांची प्रत्यक्ष लोकसंख्या मतदार संख्येपेक्षा अधिक असली तरी निवडणुकीच्या दृष्टीने मतदार संख्येवरच सर्वाधिक राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत़ वाढीव मतदार संख्येचा फायदा केवळ मनपा निवडणुकीत होईल़शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार२०११ च्या जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार ५५९ इतकी आहे़ त्यात १ लाख ९३ हजार ४४६ पुरुष व १ लाख ८२ हजार ११३ स्त्रियांचा समावेश आहे़शहर हद्दवाढीतील गावांमधील मतदार धुळे मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार असले तरी ते धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मतदान करू शकणार नाही़ त्यांचा विधानसभा मतदारसंघच धुळे ग्रामीण असेल़ नगाव गावातील गावठाण भाग मनपा क्षेत्रात सहभागी झाला असल्याने या गावाचे नागरिक मनपा निवडणुकीत मतदान करू शकणार नाही़वाढीव क्षेत्रात सुविधा देण्याचे आव्हानशहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या १० गावांमधील मतदार मनपा निवडणुकीत मतदान करणार असल्याने येत्या काळात संबंधित गावांमध्येदेखील सोयी-सुविधा पुरविण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवक व इच्छुकांना करावे लागणार आहे़ हद्दवाढीमुळे नगरसेवकांची संख्या ५ ने वाढण्याची शक्यता असली तरी त्याबाबतची स्पष्टता प्रभाग रचनेनंतरच होणार आहे़