लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नागरिकांना अल्पदरात आरोग्य चाचण्या करणे शक्य व्हावे यासाठी मनपा आरोग्य विभाग रोटरी क्लब या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने दोन ‘पॅथॉलॉजी लॅब’ सुरू करणार आहे़ आठ महिन्यांपासून प्रस्तावित असलेल्या या ‘पॅथॉलॉजी लॅब’ महिनाभरात सुरू होणार आहेत़ सद्यस्थितीत धुळे महापालिकेच्या सुतिकागृह दवाखाना व देवपूर दवाखाना याठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन प्रयोगशाळा कार्यरत आहेत़ त्यामध्ये करार तत्वावर कार्यरत तंत्रज्ञ काम पाहतात़ या दोन्ही प्रयोगशाळांमध्ये रक्त तपासणी, कावीळ, एड्स यांसारख्या काही मोजक्याच आजारांच्या चाचण्या केल्या जातात़ या आरोग्य चाचण्या मोफत असून त्यांचा लाभ दरमहा ३०० ते ४०० रूग्ण घेत असतात़ देवपूर दवाखान्यात कार्यान्वित असलेल्या प्रयोगशाळेत महिन्याला ५० ते ६० रूग्ण लाभ घेत असून त्यांना प्रत्येकी २० रूपये फी आकारणी केली जाते़ मात्र मनपा आरोग्य विभागाने रोटरी क्लब या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध करून अद्ययावत पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे काही रूग्णांना सर्व आजारांवरील चाचण्या अल्पदरात करणे शक्य होईल़ महापालिकेच्या पॅथॉलॉजी लॅब सुरू झाल्यास नागरिकांना विविध खर्चिक स्वरूपाच्या चाचण्या अल्पदरात करणे शक्य होणार आहे तसेच रिपोर्टही तत्काळ मिळेल़ त्याचप्रमाणे धुळे महापालिकेचे १० अॅलॉपॅथी दवाखाने, २ सुतिकागृह, १ कुटूंब कल्याण केंद्र, आयुर्वेद पंचकर्म दवाखाना याठिकाणी येणाºया गरीब व गरजू रूग्णांना लॅबचा लाभ होणार आहे़ सदरच्या पॅथॉलॉजी लॅबमधील विविध चाचण्या ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर केल्या जाणार आहेत़ या चाचण्या मानधन तत्वावर कार्यरत प्रयोगशाळा तंत्रज्ञ संस्थेतर्फे दिल्या जाणाºया पॅथॉलॉजिस्ट, तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे़ शहरात मनपाची प्रशस्त प्रयोगशाळा नसल्याने नागरिकांना खासगी प्रयोगशाळांचा आधार घ्यावा लागतो़ खासगी प्रयोगशाळांचे शुल्क महागडे असून ते सर्वसामान्यांना परवडत नाही़‘पॅथॉलॉजी लॅब’साठी प्रस्तावित प्रयोगशाळांची पाहणी नुकतीच केली असून येत्या महिनाभरात नवीन साहित्यासह नुतनीकरणाचे काम पूर्ण करून लॅब सुरू केल्या जातील, असे रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय चांडक यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले़महापालिकेच्या महासभेत गेल्या वर्षीच त्याबाबतचा ठराव झाला असून आरोग्य विभागाने प्रयोगशाळांसाठी रसायने व साहित्य खरेदी केली आहे़
धुळे मनपाच्या पॅथॉलॉजी लॅब महिन्याभरात सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 1:16 PM
१० महिन्यांपासून प्रस्तावित : सामाजिक संस्थेच्या हातभाराने आरोग्य सेवेचा विस्तार
ठळक मुद्देगेल्यावर्षी मनपाच्या महासभेत झाला होता ठरावप्रस्तावित प्रयोगशाळांची पहाणीनुतनीकरणाचे काम लवकरच पूणॅ होणार