लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नाफेडतर्फे २०१७-१८ या हंगामासाठी धुळे-नंदुरबार जिल्ह्यासाठी तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील पाच खरेदी केंद्रावर १७ फेब्रुवारीपर्यंत १२१ शेतकºयांकडून ९७९.६० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या १७ दिवसात दोंडाईचा व शहादा येथे अद्याप एकाही शेतकºयाची तुर खरेदी करण्यात आलेली नाही.गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीही तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. एक फेब्रुवारी २०१८ पासून नाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा येथे तर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व शहादा येथे आॅनलाईन तुर खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. शासनाने तुरीला ५ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल दर व २५० रूपये बोनस असा एकूण ५ हजार ४५० रूपये भाव जाहीर केलेला आहे. खुल्या बाजारपेठेत व्यापारीवर्गाकडून तुरीला अपेक्षित भाव देत नाहीत, म्हणून शेतकºयांना नाफेडच्या खरेदीकेद्रावर तुर विक्रीकडे जास्त कल असतो.आॅनलाईन खरेदीसाठी शेतकºयांना अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे.दरम्यान १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या खरेदी केंद्रांपैकी गेल्या १७ दिवसात सर्वाधिक खरेदी धुळे केंद्रावर झालेली आहे. या ठिकाणी १३५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ६३ शेतकºयांकडून ५५५. ३० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. शिरपूर केंद्रावर ४१ शेतकºयांनी नोंदणी केली. त्यापैकी २२ शेतकºयांची २०८ क्विंटल तुर खरेदी करण्यात आलेली आहे. नंदुरबार खरेदी केंद्रावर ४० शेतकºयांनी नोंदणी केली. त्यापैकी ३७ शेतकºयांकडून २१६.३० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे.दोन केंद्रावर नोंदणी करून खरेदी नाहीदोंडाईचा येथील केंद्रावर १२ तर शहादा केंद्रावर २८ शेतकºयांनी आतापर्यंत तुरीची नोंदणी केली आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी अद्याप तुरीची खरेदी झालेली नसल्याचे सांगण्यात येते.खरेदीचीही मर्यादाआॅनलाईन प्रक्रिया चांगली आहे. याला शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे अनेक शेतकरी आॅनलाईन नोंदणी करीत असतात. असे असतांना शासनाने तुर खरेदीची मर्यादा वाढविण्याऐवजी ती घटवलेली आहे. एका दिवसात एका शेतकºयाची केवळ २५ क्विंटल तुर खरेदीची मर्यादा आहे. त्यामुळे तुर खरेदीला ‘ब्रेक’ बसू शकतो, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात अनेक प्रयोगशील शेतकरी असून, ते सरासरीपेक्षा अधिक उत्पन्न घेत असतात. त्यांना या मर्यादेचा फटका बसू शकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नवीन नियमांची भरदरम्यान यावर्षी तूर खरेदी प्रक्रियेत काही नवीन नियमांची भर पडलेली आहे. दरवेळी तुरीची पोते हे सुतळीच्या साह्याने शिवण्यात येत होती. मात्र यावर्षापासून ती मशीनच्या साह्याने शिवण्यात यावी असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. यासाठी कोणत्या रंगाचा दोरा वापरावा ते देखील निश्चित करण्यात आलेले आहेत.