धुळे, दि.24- नाफेडतर्फे सुरू असलेली खरेदी केंद्रे बंद झाल्यानंतर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मिळून सुमारे साडेचार हजार क्विंटल तुरीची खरेदी शिल्लक राहिली आहे. धुळे जिल्ह्यात 22 एप्रिलर्पयत दोन केंद्रे मिळून 29 हजार 794.50 क्विंटल तर नंदुरबार जिल्ह्यात दोन केंद्रे मिळून 28 हजार 404.50 क्विंटल अशी एकूण 58 हजार 199 क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
धुळे व शिरपूर खरेदी केंद्रांवर प्रत्येकी 200 क्ंिवटल तूर खरेदीची शेतक:यांना प्रतीक्षा आहे. ही तूर केंद्रांवर वाहनांमधून आणण्यात आली आहे. तर नंदुरबार केंद्रावर आवक निरंक असून शहादा केंद्रावर मात्र सुमारे 200 शेतक:यांनी तूर विक्रीसाठी आगावू नोंदणी केली आहे. त्यांची सुमारे 4 हजार क्विंटल तूर खरेदी शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी (डीएमओ) के.एस. शिंदे यांनी दिली.
या एकूण तुरीच्या खरेदीपोटी 4 हजार 160 शेतक:यांचे मिळून 29 कोटी 39 लाख रुपयांचे पेमेंट झाले आहे. त्या पैकी 31 मार्चर्पयत खरेदी केलेल्या तुरीच्या खरेदीपोटी दोन्ही जिल्ह्यातील 3 हजार 305 शेतक:यांचे 24 कोटी 60 लाख रुपये पेमेंट अदा करण्यात आले आहे. तर 855 शेतक:यांचे चुकारे बाकी आहेत. त्या चुका:यांची रक्कम 4 कोटी 79 लाख रुपये आहे. सोमवारी त्यापैकी 1 कोटी 36 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.