धुळे : शहरातील प्रमुख रस्ते, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, दुकाने, बॅकांबाहेरील अवैध पॉर्किंगच्या समस्यांना रोजच सामोरे जावे लागत आहे़ महापालिकेने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ‘पे अॅण्ड पॉर्किंग’ धोरण राबविण्याची अपेक्षा ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात नागरिकांकडून व्यक्त झाली आहे़ शहरातील बेशिस्त पॉर्किंग, कर्कश आवाजातील हॉर्न, वाहतुक नियमांचे उल्लंघन अशा रोजच्या समस्यांना तोंड देत व जीव मुठीत धरून धुळेकरांना शहरातुन मार्ग काढत घरी सुखरूप पोहचावे लागते़ मात्र प्रशासनाकडून अवैध पॉर्किंगबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होते. महापालिकेने पे अॅण्ड पार्क' धोरण राबविल्यास शहरातील वाहतूकीवर नियंत्रण, इंधनाची बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचा ºहास यावर नियंत्रण मिळवता येवू शकते़ यासाठी महापालिकेने शहरात सशुल्क पॉर्किंग (पे अॅण्ड पार्क) धोरण राबविण्याची गरज या सर्वेक्षणात व्यक्त झाली़ वाहतूक ताणावर उपाय शहराची लोकसंख्या व वाहनसंख्येत होणाºया वाढीमुळे वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे़ त्यामुळे शहरात पॉर्किंग प्रश्न निर्माण झाला आहे़ हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेच्या मालकीचे भुखंड व खाजगी जागांवर सशुल्क वाहनतळाची व्यवस्था केल्यास शहरातील पॉर्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघू शकतो़ अशी होऊ शकते विभागणी शहरातील देवपूर १, देवपूर २ वॉर्ड, मोहाडी, दत्त मंदिर चौक, देवपूर बस नेहरू चौक, सुभाषनगर आदी ठिकाणी पॉर्किंग झोन तयार केल्यास परिसरातील वाहनाच्या पॉर्किंगचा प्रश्न सोडविता येवू शकते़ नियमीत पॉर्किंग होणाºया दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना दरपत्रक निश्चित करून या सुविधेचा मासिक पास उपलब्ध करून दिल्यास महापालिका प्रशासनाला आर्थिक फायदाही मिळविता येवू शकतो़ त्यामुळे शहरातील दुकानासमोर वाहनांची पॉर्किंग व रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविता येऊ शकेल.सिग्नल यंत्रणेचा बोजवाराशहरातील सिग्नल यंत्रणेचा बोजवाºयामुळे परिवर्तनाची आस धरून असलेल्या शहरास सध्या वाहतूक कोंडीच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाढलेली गर्दी, दिरंगाईने होणारी रस्त्याची कामे आणि त्यामुळे अरुंद झालेले रस्ते, यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा केवळ देखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सिग्नल यंत्रणाच नसल्याने चौकात वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवते. महापालिकेने पॉर्किंगचा प्रश्न सोडविल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सहज सुटेल, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणावेळी सांगितले़
धुळे :शहरात ‘पे अॅण्ड पॉॅर्किंग’ धोरण राबविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:01 PM
महापालिका : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमन प्रश्न गंभीर
ठळक मुद्देdhule